शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी समितीत गाजला लिपिकांच्या आंदोलनाचा मुद्दा

By admin | Updated: July 21, 2016 00:22 IST

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने राज्यभरात पुकारलेले लेखणीबंद आंदोलन आज सहाव्या दिवशीही सुरुच होते.

सहाव्या दिवशीही आंदोलन सुरुच : जि.प. अध्यक्ष व सभापतींची आंदोलनस्थळी भेटभंडारा : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने राज्यभरात पुकारलेले लेखणीबंद आंदोलन आज सहाव्या दिवशीही सुरुच होते. शासनाने आंदोलनाची दखल घेत राज्यभरातील जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लिपिकांची कर्तव्यसूची तयार करण्याचे आदेश दिले आहे. परंतु संघटनेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कर्तव्यसूचीचा विरोध करण्यात आलेला आहे.विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य लिपिकवर्गीय संघटनेच्या वतीने संपूर्ण राज्यभरातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांनी लेखणीबंद आंदोलनाचा पवित्रा घेत १५ जुलै पासून लेखणीबंद आंदोलन सुरु केले. यात लिपिकांचे ग्रेड वेतनातील तफावत दूर करणे, कर्तव्यसूची तयार करणे, पदोन्नती आदी विविध मागण्यांचा समावेश आहे. शासनातर्फे आंदोलनाचा धसका घेत १५ जुलै रोजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलाविण्यात आली. या बैठकीमध्ये संघटनेच्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून ना.पंकजा मुंडे यांनी लिपिकांची कर्तव्यसूची तयार करण्याचे आदेश दिले. ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने १६ जुलै रोजी राज्यातील जिल्हा परिषदांच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांची कर्तव्यसूची तयार करून ते संबंधितांना देण्याचे आदेश देण्यात आले. परंतु सदर ग्रामविकास विभागाच्या या पत्राचा संघटनेच्या वतीने निषेध करून कर्तव्यसूची ही शासनाकडून पाहिजे असल्याची मागणी यावेळी लावून धरण्यात आली. आज २० जुलै रोजी आयोजित जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत लिपिकांच्या आंदोलनाचा मुद्दा जिल्हा परिषद सदस्य धनेंद्र तुरकर यांनी उपस्थित लावून धरला. यावेळी सभेत आंदोलनाबाबत जिल्हा परिषदेकडून मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे ठरविण्यात आले. दरम्यान लिपिकांच्या आंदोलनस्थळी भेट देवून जिल्हा परिषदेचे अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर यांनी आंदोलनाला समर्थन असल्याचे सांगून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या मंत्रालयाला कळवणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती विनायक बुरडे हेसुद्धा उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)