शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

बेला शाळेत आयएसओ मानांकन प्रमाणपत्र वितरण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 23:46 IST

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बेला ही जिल्ह्यातील पहिली आयएसओ मानांकीत शाळा ठरली आहे.

ठळक मुद्देनवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्यांचा सत्कार : शाळेत राबविले जातात नाविण्यपूर्ण उपक्रम, प्रि-प्रायमरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश

आॅनलाईन लोकमतभंडारा : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बेला ही जिल्ह्यातील पहिली आयएसओ मानांकीत शाळा ठरली आहे. याची घोषणा ५ सप्टेंबर २०१७ ला आयएसओ कार्यालयाकडून करण्यात आली होती. त्या अनुशंगाने शाळेला सोमवारला आएसओचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.या कार्यक्रमाचे औचित्य साधून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा परिचय व सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाची सुरुवात शारदा पूजन, स्वागत गीत व समूहगीताने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच शारदा गायधने या होत्या. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय गाढवे, गट शिक्षणाधिकारी विनोद चरपे, शिक्षण विस्तार अधिकारी कविता पाटील, केंद्र प्रमुख रमेश माने, केंद्र प्रमुख प्रदीप काटेखाये, विशेष अतिथी म्हणून आयएओ अधिकारी अतुल गोटे, आयएसओ अधिकारी राहुल मानवटकर, नवनिर्वाचित ग्रा.पं. सदस्य, उपसरपंच अर्चना कांबळे, ओमप्रकाश ठवकर, कन्हैय्यालाल नागपूरे, मुख्याध्यापीका सरिता निमजे यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे औचित्य साधून नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य राकेश फेंडर, अरुण गोंडाणे, रेखा भिवगडे, पंचफुला मेश्राम यांचा शाळेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व परिचय करून देण्यात आला.प्रास्ताविक मुख्याध्यापिका सरिता निमजे यांनी केले. यावेळभ त्यांनी शाळेने राबविलेल्या विविध उपक्रमाचा गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाळेने केलेल्या प्रगतीचा आढावा सांगितला. गट शिक्षणाधिकारी विनोद चरपे, केंद्र प्रमुच रमेश माने, केंद्र प्रमुख प्रदीप काटेखाये यांनी समायोचित मार्गदर्शन केले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय गाढवे यांनी, विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. शाळेचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तराचा करण्यासाठी शाळेला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन गाढवे यांनी यावेळी दिले. आयएसओ अधिकारी अतुल गोटे यांनी, शाळा समिती व शिक्षकांना अत्यंत महत्वाच्या सूचना दिल्या. गुणवत्तापुरक वातावरण शाळेत तयार करण्याविषयी मार्गदर्शन केले. शाळेत असणाऱ्या संसाधना विषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. आयएसओ दर्जा प्राप्त केल्याबाबद सर्वांचे अभिनंदन केले. वेळोवेळी शाळेला मार्गदर्शन करण्याविषयी आश्वस्त केले.अध्यक्षीय भाषणातून शारदा गायधने यांनी शाळा आयएसओ करण्यासाठी ग्रामपंचायतीने कार्य केलेल्या निधी तसेच वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शन व सहकार्या विषयी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन अनिल शहारे यांनी केले. आभार प्रदर्शन लता निचत यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी शाळेचे शिक्षक संजय उपरीकर, शुद्धोधन बोरकर, रहिले, टिचकुले, वाडीभस्मे, किरण पाटील, शिक्षकेत्तर कर्मचारी रत्ना तितीरमारे, मंजू टांगले, अचल मेश्राम यांनी सहकार्य केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्याने व योग्य मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे डॉ. छगन खोब्रागडे, जयश्री मते, सुगंधा ढबाले, भावना सेलोकर, संगीता गजभिये, तबस्सूम खान यांनी सहकार्य दिले. आएसओ मानांकन शाळेला प्राप्त झाल्याने शाळेच्या शिक्षकांवर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्व शिक्षण देण्याची जबाबदारी वाढली आहे. पालकांची उपस्थिती होती.