शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
2
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
3
"भगवा दहशतवाद म्हणणाऱ्यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी’’, एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर टीका   
4
'एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकेल'; अमेरिकेचा पाकिस्तानसोबत करार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
5
"काँग्रेसने संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागावी..."; मालेगाव निकालावर CM फडणवीसांचं रोखठोक मत
6
हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...
7
रतन टाटांच्या काळात जे घडलं नाही, ते आता घडणार; 'हा' मोठा ग्रुप टाटा सन्स सोडणार?
8
एक नंबर! गोड खाऊनही कमी करता येतं वजन; फक्त माहीत असायला हवी योग्य वेळ अन् पद्धत
9
बाईकचा चेसिस नंबर सापडलाच नाही! प्रज्ञा सिंह ठाकूर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून कशा सुटल्या?
10
Gold Silver Price 31 July 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावे लागणार; पाहा नवे दर
11
Shravan Shukravar 2025: श्रावणातल्या कोणत्याही एका शुक्रवारी भरा देवीची ओटी आणि 'असा' मागा जोगवा!
12
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
13
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
14
Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!
15
पाकिस्तानी बॉर्डरजवळ विखुरलेल्या बांगड्यांचं सत्य काय?; भारताने शोधून काढलं दडलेलं रहस्य
16
मालेगाव बॉम्बस्फोटाच्या निर्णयावर ओवेसी नाराज, मोदी सरकारवर केले गंभीर आरोप...
17
शिक्षण महागलं! "ABCD शिकवण्याचे २.५ लाख द्यायचे?"; लेकीची नर्सरीची फी पाहून आई शॉक
18
सावधान! AI मुळे 'या' नोकऱ्या धोक्यात? मायक्रोसॉफ्टच्या अभ्यासात धक्कादायक खुलासा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का?
19
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
20
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल

१७ हजार हेक्टरपैकी केवळ सात हजार हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ

By admin | Updated: September 8, 2014 00:44 IST

बावनथडी (राजीव सागर) सिंचन प्रकल्पातून उन्हाळ्यात दोन हजार हेक्टर तर इतर मोसमात १७ हजार हेक्टरपैकी केवळ ७ ते ८ हजार हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळत आहे.

तुमसर : बावनथडी (राजीव सागर) सिंचन प्रकल्पातून उन्हाळ्यात दोन हजार हेक्टर तर इतर मोसमात १७ हजार हेक्टरपैकी केवळ ७ ते ८ हजार हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ मिळत आहे. प्रकल्पाची १५ ते २० टक्के कामे शिल्लक आहेत. संपूर्ण प्रकल्प (वितरिका) पूर्णत्वाकरिता ७० ते ८० कोटी निधीची गरज आहे. सध्या प्रकल्पात केवळ ५० टक्के जलसाठा आहे. या जलसाठ्यावर महाराष्ट्र व मध्यप्रदेशाचा ५० - ५० टक्के हक्क आहे.बावनथडी प्रकल्प तुमसर तालुक्यातील सितेकसा गावाजवळ असून संपूर्ण प्रकल्प पूर्णत्वास येण्याकरिता वितरिका सह, जमीन हस्तांतरण, रेल्वे क्रॉसींगची कामे अपूर्ण आहेत. या संपूर्ण कामाकरिता ७० ते ८० कोटींचा निधी लागणार आहे. सन २०१५ च्या शेवटी या प्रकल्पाची संपूर्ण कामे पूर्ण होतील अशी माहिती आहे. या प्रकल्पातून सन २०१३-१४ मध्ये पाणी सोडण्यात आले होते. उन्हाळ्यात २० ते २५ गावांना सिंचनाचा लाभ झाला. सुमारे दोच्न हजार हेक्टर शेतीला पाणी पोहचले. येथे पुन्हा १५ ते २० टक्के वितरिकेची कामे शिल्लक आहेत. वितरिकेला जमीन मिळाली नाही. यात तुमसर, राजापूर, बोरी, कारली, देव्हाडी, चारगाव, ढोरवाडा, सुकळी, मांढळ, उमरवाडा, नवरगाव, माडगी, बाम्हणी, मांगलीसह काही गावात वितरिकेची कामेच झाली नाही.रेल्वे क्रॉसिंगला मंजुरी मिळाली नाही. जमीन हस्तांतरणाची कामे झाली नाही. सन २०१५ पर्यंत ही कामे होतील अशी माहिती आहे. जमीन हस्तांतरणाकरिता १२ ते १३ कोटी निधीची गरज आहे.शेतकऱ्यांना येथे टप्प्याटप्प्याने धरणातून पाणी सोडले जात आहे. २५ टक्केच पाणीसाठा महाराष्ट्राच्या वाट्याला आल्याने पाण्याची बचत व योग्य विनियोग कसे करता येईल याचा आराखडा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गेडाम यांनी तयार केला आहे.प्रकल्पाचा मुख्य कालवा २६ कि.मी. लांबीचा आहे. त्यानंतर दोन लघु कालवे दोन दिशेने जातात. यापूर्वी दोन्ही लघु कालव्यातून पाणी सोडले जात होते. त्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होत होता. सध्या एक लघु कालवा सहा दिवस सुरु राहील. तर दुसरा लघुकालवा त्यानंतर सुरु राहील. असे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.अनेक ठिकाणी कालवे फुटली असून त्यांना भगदाड पडले आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी कालव्यांना पाण्याकरिता भगदाड पडले आहेत.सध्या वितरीकेची कामे बंद असून आॅक्टोबरनंतर ती सुरु होणार असल्याची माहिती आहे. कासवगतीने अशीच कामे सुरु राहीली तर निदान ५ ते ७ वर्षे पुन्हा प्रकल्पातून शेतकऱ्यांना पाण्याची वाट पाहावी लागणार असे दिसते.