शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

अंशकालीन निदेशकांना सेवेत सामावून घ्या

By admin | Updated: August 25, 2014 23:48 IST

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १९ आणि अधिनियमनाचे परिशिष्ट अ प्रमाणे ज्या उच्च प्राथमिक शाळेची पटसंख्या १०० पेक्षा जास्त आहे

सासरा : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १९ आणि अधिनियमनाचे परिशिष्ट अ प्रमाणे ज्या उच्च प्राथमिक शाळेची पटसंख्या १०० पेक्षा जास्त आहे अशा शाळांमध्ये कला शिक्षण, शारीरिक शिक्षण व आरोग्य तसेच कार्यानुभव या विषयांचे अध्यापन करण्यासाठी अंशालीन निदेशकांची नियुक्ती करण्याचा शासन निर्णय १८ जून २०१० ला पारित करण्यात आला. तरीपण सत्र २०१०-११ व २०११-१२ मध्ये सदर पदे भरण्यात आली नाहीत. सत्र २०१२-१३ मध्ये या शासन निर्णयाची दखल घेऊन प्रशासनाने शासनाच्या निर्देशानुसार शाळा व्यवस्थापन समिती मार्फत ही पदे भरली. सदर पदे ५ महिने १० महिने अशा खंडीत सेवाशर्तीने भरली होती. त्यानंतर सत्र २०१३-१४ मध्ये ही पदे पूर्ववत न भरल्या गेल्याने या सत्रात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले.२०११ च्या शासन निर्णयानुसार, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत चालविण्यात येणाऱ्या उच्च प्राथमिक शाळांची (इ. ६ ते ८ वी) पट संख्या १०० पेक्षा जास्त असलेल्या शाळांमध्ये ३० सप्टेंबर २०१३ च्या युडायस डेटानुसार १८३५ शाळांमध्ये कला शिक्षण, शारीरिक शिक्षण व आरोग्य तसेच कार्यशिक्षण या विषयांचे अध्यापन करण्यासाठी प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र याप्रमाणे ५५०५ अंशकालीन निदेशकाची पदे निर्माण करण्यास आणि कंत्राटी पद्धतीने तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर नियुक्ती करण्याची मान्यता दिली. सत्र २०१३-१४ मध्ये ही पदे भरली न गेल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. सत्र २०१२-१३ मध्ये अधिकृतपणे काम करणाऱ्या अंशकालीन निदेशकांचा हिरमोड झाला. आज किंवा उद्या आपली दखल घेतल्या जाईल या आशेवर असताना सत्र २०१३-१४ उलटून गेला. सत्र २०१४-१५ अर्ध्यावर आला. अद्यापही या अंशकालीन निदेशकांची नियुक्ती करण्यात आली नाही. या संबंधाने पाठपुरावा केला असता आपल्याला कायमस्वरुपी सेवेत घेतले जाईल असे आश्वासन दिले होते. पण ते हवेतच विरल्याचे दिसत आहे. या २१ आॅगस्ट २०१४ च्या शासन निर्णयात परिशिष्ट अ मध्ये जिल्हा निहाय संख्या दर्शविल्याप्रमाणे ३० सप्टेंबरच्या माहितीनुसार राज्यातील एकुण ३३ जिल्ह्यातील १८३५ शाळांमध्ये प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र या प्रमाणे ५५०५ पदांना नियुक्त करण्याची मान्यता देण्यात आली. याकरिता संबंधित अंशकालीन निदेशकांची शैक्षणिक अर्हता व व्यवसायीक पात्रता निश्चित करण्यात आली. या पदावर नियुक्ती देण्यात येणाऱ्या उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्ष व कमाल ३३ वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आली. तसेच मागासवर्गीयांसाठी ३८ वर्ष वयोमर्यादा निश्चित करण्यात आली. तसेच अंशकालीन निदेशकांना प्रती तासिका रु. ५० याप्रमाणे दरमहा रुपये ५००० या कमाल मर्यादेत मानधन अनुज्ञेय करण्यात आला. या पदांच्या निवडीकरिता शाळा व्यवस्थापन समिती ऐवजी जिल्हास्तर निवड समिती, बृहन्मुंबई महानगरपालिका स्तर निवड समिती स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली. या शासन निर्णयाने यापूर्वी काम केलेल्या अंशकालीन निदेशकांवर अन्याय केला असल्याचे दिसून येत आहे. या नवीन निर्णयात यापूर्वी कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या अंशकालीन निदेशकांना सुद्धा पात्रतेच्या अधिन राहून परीक्षा द्यावी लागेल. सर्वांना विनाअट सेवेत सामावून न घेतल्यास महाराष्ट्रात कोठेही आम्ही आत्मदहन करू असा लेखी इशारा शासन प्रशासनाला दिला असल्याची माहिती आहे. आम्हावर अन्याय करू नका आम्हाला न्याय द्या, नवीन शासन निर्णय रद्द करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)