साकोली : येथील महामार्ग चौपदरीकरणाचे काम करण्यात मात्र वनविभागाच्या परवानगी नाकारल्याने जांभळी ते मुंडीपार या पाच कि़मी. रस्त्याचे चौपदरीकरण झाले नाही. परिणामी या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्यावर खड्डे की खडड्यात रस्ता असा प्रश्न वाहनचालकाना पडतो आहे. संबंधित विभागाने तात्काळ हा रस्ता दुरूस्त करावा, अशी मागणी कुंभली क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य प्राचार्य होमराज कापगते यांनी केली आहे. मागण्या पूर्ण न झाल्या काँग्रेस पक्षातर्फे आंदोलन करण्यात करण्यात येईल, असा इशाराही कापगते यांनी दिला आहे.भंडारा ते देवरीपर्यंत महामार्ग चौपदरीकरणाचे काम करण्यात आले. त्यावेळी साकोली जवळील जांभळी ते मुंडीपार या पाच कि़मी. अंतरच्या रस्त्याच्या दुतर्फा घनदाट जंगल असल्याने या रस्त्यावरून वन्यप्राणी इकडून तिकडे ये-जा करतात. या ठिकाणी महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यास वाहनांचा वेग वाढेल व वन्यप्राणी अपघातात मरतील असा वनविभागाचा अंदाज आहे व त्यामुळे वनविभागाने या पाच कि़मी. अंतराच्या रस्त्याच्या बाजूची झाडे कापण्यास व चौपदरीकरणास मंजुरी नाकारली. त्यामुळे हा रस्ता तसाच रखडलेला आहे. सदर रस्त्यावरून २४ तास वाहतूक असल्याने व मागील पाच वर्षापासून या रस्त्याची दुरूस्ती झाली नसल्याने या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून जाताना वाहनचालकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. तसेच मोठे खड्डे असल्याने दररोज या रस्त्यावर वाहन खराब होत आहेत. तसेच अपघाताच्या संख्येतही वाढ झाली आहे.संबंधित विभागाने तात्काळ या रस्त्याची दुरूस्ती करावी व होणारे अपघात थांबवावे, अशी मागणी कुंभली क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य प्राचार्य होमराज कापगते यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
महामार्ग देतोय मृत्युला आमंत्रण
By admin | Updated: August 21, 2015 00:20 IST