शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीतील रिकाम्या भृूखंडाची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 01:18 IST

येथील एमआयडीसी परिसरात मागील अडीच दशकापासून अनेक भूखंड रिकामे आहेत. एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रिकाम्या भुखंडाची चौकशी होणार असल्याची माहिती आहे. यामुळे भूखंडधारकात एकच खळबळ उडाली आहे. राज्य शासनाकडून रिकाम्या भूखंडाची माहिती मागितल्याचे समजते.

ठळक मुद्देतुमसर रोड येथील प्रकरण : अडीच दशकांपासून भूखंड रिकामे

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : येथील एमआयडीसी परिसरात मागील अडीच दशकापासून अनेक भूखंड रिकामे आहेत. एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून रिकाम्या भुखंडाची चौकशी होणार असल्याची माहिती आहे. यामुळे भूखंडधारकात एकच खळबळ उडाली आहे. राज्य शासनाकडून रिकाम्या भूखंडाची माहिती मागितल्याचे समजते. चौकशी होणाऱ्या एमआयडीसीत तुमसर रोड देव्हाडीचा समावेश आहे.प्रत्येक तालुक्यात औद्योगिक विकासाकरिता एमआयडीसीची स्थापना ३० वर्षापूर्वी करण्यात आली होती. शेतकऱ्यांकडून रस्त्याशेजारील मौल्यवान शेतजमिनी शासनाकडून खरेदी करण्यात आल्या. देव्हाडी येथे तुमसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर एमआयडीसी करिता जागा खरेदी करण्यात आली. सुमारे १५ एकर शेतजमिनीचा त्यात समावेश आहे.एमआयडीसीत नाममात्र शुल्क आकारून शासनाने उद्योजकांना भूखंड वितरित केले. सुमारे २५ वर्षाचा कालखंड लोटला तरी काहींनी आतापर्यंत उद्योग सुरू केले नाही. काही उद्योग येथे बंद पडले. त्यांच्या इमारती तेवढ्या शिल्लक आहेत. भूखंड मिळाल्यानंतर किमान तीन वर्षात उद्योगधंदा सुरू करण्याचा नियम आहे.वीज, पाणी, रस्त्याची सुविधातुमसर रोड येथील एमआयडीसी राष्ट्रीय महामार्गावर असून येथे रेल्वेस्थानक आहे. विजेची स्वतंत्र व्यवस्था येथे आहे. पाण्याचा मुबलक साठा असून अंतर्गत रस्ते डामरीकरणाचे तयार आहेत. परंतु उद्योजकांनी येथे पाठ फिरविली आहे. रिकामे भूखंड शासन जमा होण्याची येथे शक्यता वर्तविली जात आहे. स्कील इंडिया अंतर्गत क्लस्टर तयार करण्याची येथे तयारी सुरू असल्याचे समजते. उद्योग स्थापक करण्याकरीता लागणाºया मुलभूत सोयी सुविधा येथे उपलब्ध आहेत, हे विशेष.देव्हाडी एमआयडीसी परिसर उद्योगाकरीता वरदान आहे, बेरोजगार तरूण नागपूरसह इतर ठिकाणी रोजगाराकरिता जात आहेत. शासनाने उद्योगांना चालना देऊन भूखंडधारकांच्या समस्या जाणून घेणे गरजेचे आहे. तालुक्यात रोजगार वाढीकरिता उद्योगधंदे शासनाने प्रयत्न करावे.-डॉ. पंकज कारेमोरे, काँग्रेस नेते तुमसर.

टॅग्स :MIDCएमआयडीसी