शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

बिबट मृत्युप्रकरणाचा तपास थंडबस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 01:11 IST

विजेच्या तारांचा स्पर्श होऊन मृत्युमुखी पडलेल्या बिबट्याला राष्ट्रीय महामार्गाजवळ फेकून दिल्याची घटना ११ एप्रिल रोजी उघडकीस आली होती. या घटनेला दोन आठवडे लोटूनही यातील आरोपींपर्यंत वन विभाग पोहचू शकले नाही.

ठळक मुद्देआरोपी मोकाटच : वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विजेच्या तारांचा स्पर्श होऊन मृत्युमुखी पडलेल्या बिबट्याला राष्ट्रीय महामार्गाजवळ फेकून दिल्याची घटना ११ एप्रिल रोजी उघडकीस आली होती. या घटनेला दोन आठवडे लोटूनही यातील आरोपींपर्यंत वन विभाग पोहचू शकले नाही. एकामागोमाग वन्यप्राण्यांचा जीव जात असताना त्यातील दोषींना पाठीशी घातले जात असल्याने वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.११ एप्रिल रोजी पलाडी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला एक बिबट मृतावस्थेत आढळून आला होता. बिबट्याची तपासणी केली असता त्याच्या पायाला मोठे व्रण असल्याचे दिसून आले. तसेच बिबट्याने जिवंत तार तोंडात घेतल्याने त्याची जीभ जळाल्याचे आढळून आले. उर्वरित सर्व अवयव शाबूत होते. त्यामुळे विजेच्या धक्कयाने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. शिवाय ही घटना उघडकीस येऊ नये म्हणून बिबट्याचा अपघाती मृत्यू दाखविण्यासाठी त्याला राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला आणून फेकण्यात आले होते. ही अत्यंत गंभीर बाब असून घटनेच्या दोन आठवड्यानंतरही वन विभाग आरोपींपर्यंत पोहचू शकले नाही.ज्याठिकाणी बिबट मृतावस्थेत आढळले त्याच परिसरात त्याचा विजेच्या शॉकने मृत्यू झाला असावा, असा अंदाज आहे. घटनेनंतर वन विभागाने चौकशी केली असता त्यांना अद्याप काहीही आढळून आले नाही. वन विभागाला आरोपींचा ठावठिकाणा माहित आहे, परंतु त्यांच्यावर कारवाई करण्यास दिरंगाई केली जात असल्याचा आरोप आता होत आहे. एकीकडे वन आणि वन्यजीव यांच्या संर्वधनासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना दुसरीकडे वन्यप्राण्यांचे असे हकनाक बळी जात आहेत. शिवाय त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांचा शोधही घेतला जात नसल्याने वन्यप्रेमींमध्ये असंतोष निर्माण होत आहे.'जय' नंतर 'जयचंद'ही बेपत्ताउमरेड-कºहांडला अभयारण्यातील रुबाबदार असा जय (टी १) नावाचा वाघ दोन वर्षांपासून अचानक बेपत्ता असताना आता त्याचा अपत्य 'जयचंद' (टी ५) हा वाघही बेपत्ता आहे. तो अभयारण्य सोडून दुसऱ्या जंगलात गेल्याचीही कुठे नोंद नाही. सातत्याने वन्यप्राण्यांच्या शिकारी होणे, बेपत्ता होण्याचे प्रकार वाढत असताना वन विभाग नेमका करतोय तरी काय? असा प्रश्न आहे. जय नंतर जयचंदने पर्यटकांना भूरळ घातली होती.

टॅग्स :Tigerवाघ