भंडारा : तालुका आरोग्य अधिकारी भंडारा अंतर्गत ग्रामपंचायत सालेबर्डी (सि) येथे कोविडची तपासणी घेण्यात आली. यावेळी महसूल विभागाचे मंडल अधिकारी शरद सतदेवे, तलाठी आर.एन. नेव्हारे, सरपंच महेश मेश्राम, ग्रामसेवक एस. डी. गिरेपुन्जे, डॉ. गभने, पद्मा घटारे, शासकीय योजनेचे प्रसारक कार्तिक मेश्राम, पोलीसपाटील सार्थिका गजभिये, आशा सेविका शांता भुरे, राहुल साखरे यांच्या उपस्थित कोविडची तपासणी घेण्यात आली. यात एकूण ४६ व्यक्तींनी महिला, पुरुष व लहान मुले यांनी स्वयंस्फूर्तीने तपासणीकरिता सहभाग घेतला. तसेच प्रत्यक्ष पोलीसपाटील सार्थिका गजभिये, शाहिर कार्तिक मेश्राम, सरपंच महेश मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य जयमाला पडोळे यांनी स्वतःहून कोविडची तपासणी केली. पुढल्या टप्प्यात जास्तीत जास्त लोकांची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.
अजिमाबाद येथे कोविडची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:35 IST