शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
4
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
5
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
6
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
7
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
8
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
9
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
10
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
11
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
12
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
13
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
14
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
15
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
16
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
17
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
18
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
19
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
20
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी

‘त्या’ बांधकामाची चौकशी थंडबस्त्यात

By admin | Updated: June 10, 2016 00:54 IST

बावनथडी प्रकल्पातील मुख्य कालव्यावरील बावनथडी धरण व आलेसूर-चिखली रस्त्यावरच्या पुलाचे बांधकाम निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याची...

अहवालाची प्रतीक्षा : प्रकरण बावनथडी प्रकल्पातील कामाचे विलास बन्सोड उसर्राबावनथडी प्रकल्पातील मुख्य कालव्यावरील बावनथडी धरण व आलेसूर-चिखली रस्त्यावरच्या पुलाचे बांधकाम निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याची 'लोकमत'मध्ये वृत्त प्रकाशित होताच बावनथडी प्रकल्पाचे उपअभियंत्यांनी गंभीर दखल घेवून चौकशी सुरू केली. बांधकामात वापरात येणारे सर्व साहित्याचे टेस्टींगसाठी गुणनियंत्रक उपविभाग भंडारा आंबाडी याकडे पाठविला. मात्र अद्यापही त्याचा अहवाल प्राप्त न झाल्याने चौकशी थंडबस्त्यात आहे.वन्यप्राण्यांना ये-जा करण्यासाठी मुख्य कालव्यावर पुल बांधकाम करण्यात येत आहे. सदर पुलाचे बांधकाम गोंदिया येथील सिंघानिया नामक कंत्राटदाराला देण्यात आले. सदर कंत्राटदार हा प्रकल्पातील अधिकारी, कर्मचारी यांच्या संगनमताने निकृष्ठ साहित्याचा वापर करून पुलाचे बांधकाम सुरू आहे. कमी दर्जाच्या लोखंडाचा उपयोग करीत आहे. सिमेंट अल्पप्रमाणात घालत असून बांधकामावर पाणी टाकत नसल्याने कामाचा दर्जा पुर्णत: निकृष्ठ झाला आहे, अशी शेतकऱ्यांची ओरड होती. विशेष म्हणजे नाल्यातील वाळूचा अवैधपणे चोरटी वाळुचा उपयोग सदर बांधकाम केला जात आहे. सदर बांधकाम बावनथडी धरणाच्या मुख्य कालव्यावर अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलेसूर व चिखली भागात सुरू आहे.या जंगलात कुणीही ये-जा करत नसल्याने याचाच कंत्राटदाराने गैरफायदा घेत निकृष्ट बांधकाम करत आहे. यासाठी बावनथडी प्रकल्पातील कनिष्ठ अभियंता यांच्या संगनमताने सदर काम निकृष्ट होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. सदर बांधकामावर बावनथडी प्रकल्पातील कोणीही कर्मचारी उपस्थित राहत नसल्याचीही माहिती आहे. त्यामुळे निकृष्ट बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराला पाठबळ मिळत आहे.सदर प्रकरणाची उपअभियंता बावणथडी प्रकल्प तुमसर यांनी चौकशी सुरू केली असली तरीही गुणनियंत्रकाकडून चाचणी अहवाल प्राप्त झाल्याशिवाय सदर चौकशी थंडबस्त्यातच आहे. पण वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ कर्मचाऱ्यांची पाठराखण करीत असल्याचे चित्र दिसत आहे.