शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शेतकºयांच्या मृत्युची चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:38 IST

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकाच्या फवारणीमुळे शेतकºयांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई करण्याची मागणी खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.

ठळक मुद्देनाना पटोले : प्रकरण कीटकनाशक फवारणीचे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकाच्या फवारणीमुळे शेतकºयांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून दोषींविरूद्ध कारवाई करण्याची मागणी खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.खा. पटोले यांच्या या मागणीवर केंद्र शासनाने तपासणीसाठी वरिष्ठ अधिकाºयांची चमू यवतमाळ जिल्ह्यात पाठविल्याचे सांगितले. यवतमाळ जिल्ह्याच्या दौºयानंतर पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी विषारी कीटकनाशकाच्या फवारणीमुळे २० शेतकºयांचा मृत्यु आणि जवळपास ५०० शेतकºयांचा जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहे. यातील बरेचसे रूग्ण शेतकरी रूग्णालयात व्हेंटिलेटरवर आहे. या घटनेसाठी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि कृषी अधिकारी जबाबदार आहेत.या कीटकनाशक औषधाला प्रतिबंधित केले असताना सुद्धा त्यांनी हे कीटकनाशक शेतकºयांना विकले आहे. या विषारी कीटकनाशकाच्या फवरणीमुळे शेतकºयांच्या मृत्यूचे सत्र ६ जुलैपासून सुरू आहे. मात्र, कृषी विभागाच्या अधिकाºयांनी याकडे दुर्लक्ष केले.बीटी कपाशीबाबत केलेल्या प्रचारामुळे हे पीक भरपूर उत्पादन देते. शिवाय यावर रोगाचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात या कपाशीकडे आकृष्ट झाले. मात्र, ही बाब खोटी ठरलेली आहे. त्यामुळे शेतकºयांनी कपाशीवर बोंडअळी मारण्यासाठी कीटकनाशकाची फवारणी केली. यामुळे जवळपास हजार शेतकºयांना विषबाधा झालेली आहे, असेही पत्रात त्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी आणि दोषींविरूद्ध कारवाई करण्यात यावी, मागणी खा.पटोले यांनी केली आहे.