शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

संमेलनातून आविष्कार घडतो - शारदा शांडिल्य

By admin | Updated: December 31, 2014 23:19 IST

विद्यार्थ्यांना शाळेतून नेतृत्व गुणाचे व्यासपीठ मिळत असते. या व्यासपीठावरून विविधांगी कला प्रदर्शन करता येतात. विद्यार्थ्यांनी संधी येण्याची प्रतीक्षा करू नये, संधी निर्माण केली पाहिजे.

मोहाडी: विद्यार्थ्यांना शाळेतून नेतृत्व गुणाचे व्यासपीठ मिळत असते. या व्यासपीठावरून विविधांगी कला प्रदर्शन करता येतात. विद्यार्थ्यांनी संधी येण्याची प्रतीक्षा करू नये, संधी निर्माण केली पाहिजे. अशा शालेय संमेलनातून विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा आविष्कार होत असतो, असे प्रतिपादन रामकुवर शिक्षण संस्था भंडारा अध्यक्ष शारदा शांडिल्य यांनी केले.महात्मा जोतिबा फुले हायस्कूल मोहगाव देवी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातून वरील मत शारदा शांडिल्य यांनी व्यक्त केले. संमेलनाचे उद्घाटन सरपंच राजेश लेंडे यांनी केले. व्यासपीठावर अतिथी म्हणून रामकुंवर शिक्षण संस्था सचिव अजय शांडिल्य, बोथलीचे सरपंच कैलाश तितीरमारे, मोहगाव केंद्रप्रमुख तेजस्विनी देशमुख, मुख्याध्यापक राजकुमार बांते, रामकृष्ण सेलोकर, मोतीराम बाळबुधे, प्रदीप वैद्य, एकराम डोकरीमारे यांची उपस्थिती होती.प्रास्ताविकातून मुख्याध्यापक राजकुमार बांते यांनी शाळेत राबविणारे उपक्रम व मागील तीस वर्षाची शाळेची वाटचाल याविषयी माहिती सांगितली. यावेळी केंद्रप्रमुख तेजस्विनी देशमुख यांनी विद्यार्थ्यांनी मोठे होण्याचे स्वप्न बघून ते वास्तवात उतरावे. स्पर्धेच्या काळात प्रचंड मेहनत घ्यावी असे सांगितले. यावेळी सरपंच कैलाश तितीरमारे, अजय शांडिल्य यांनी आपले मनोगतात व्यक्त केले. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून एकही रजा न घेणारे व विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक घेतलेले शिक्षक हंसराज भडके, प्रयोगशळा परिचर मोहन वाघमारे, सहायक शिक्षक हेमराज राऊत यांचा अतिथींच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे संचालन सहा. शिक्षक हेमराज राऊत तर आभार प्रदर्शन हंसराज भडके यांनी ेकले. शोभा कोचे, वर्षा ढोमणे, धनराज वैद्य, श्रीहरी पडोळे, लीलाधर लेंडे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)