शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

अवैध औषधसाठा; जप्तीची कारवाई

By admin | Updated: August 1, 2016 00:13 IST

रूग्णसेवा करताना बीएचएमएस पदवीधारक डॉक्टर रूग्णांना अ‍ॅलोपॅथीक औषध देत असल्याची तक्रार होती.

मुजबी येथील प्रकरण : अन्न, औषध प्रशासनाची कारवाईभंडारा : रूग्णसेवा करताना बीएचएमएस पदवीधारक डॉक्टर रूग्णांना अ‍ॅलोपॅथीक औषध देत असल्याची तक्रार होती. यावरून भंडारा अन्न व औषध प्रशासन विभागाने डॉक्टरच्या क्लिनीकवर छापा घालून ८३ हजारांचा अवैध औषधसाठा जप्त केला. ही कारवाई मंगळवारला तालुक्यातील मुजबी येथे करण्यात आली.मुजबी येथील डॉ. राजेश वैद्य हे बीएचएमएस पदवीधारक आहेत. त्यांनी मुजबी येथे श्री क्लिनीक थाटून रूग्णसेवा सुरू केली आहे. डॉ. वैद्य हे औषधोपचारासाठी रूग्णांना अ‍ॅलोपॅथीक औषध देत होते. अ‍ॅलोपॅथीक औषध देण्याची परवानगी त्यांना नसतानाही रूग्णांना अधिक किंमतीत अ‍ॅलोपॅथीक औषध देत असल्याची तक्रार भंडारा येथील अन्न व औषध प्रशासनाला प्राप्त झाली. यावरून सदर विभागाच्या पथकाने ४ मे ला श्री क्लिनीकवर छापा घातला असता मोठ्या प्रमाणात अ‍ॅलोपॅथीक औषधसाठा आढळून आला. तो प्रतिबंधीत करून औषधांच्या खरेदीचे बील सादर करण्याचे निर्देश डॉ. वैद्य यांना देण्यात आले होते. मात्र, दिलेल्या कालावधीत डॉ. वैद्य यांनी औषध खरेदीचे बील सादर केले नाही.औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० नुसार औषध साठवणुक व औषध विक्री नियंत्रीत केले जाते. कोणतेही परवानाधारक किंवा डॉक्टर यांनी योग्य त्या औषध परवानाधारकाकडून योग्य त्या बिलाने औषध खरेदी करणे अनिवार्य आहे. असे असतानाही डॉ. वैद्य यांनी अवैध औषधसाठा बाळगला. त्यामुळे सहायक आयुक्त डी. आर. गहाणे यांच्या मार्गदर्शनात औषध निरीक्षक प्रशांत रामटेके, मनिष गोतमारे यांनी २६ जुलैला श्री क्लिनीकवर छापा घालून ८३ हजारांचा औषधसाठा जप्त केला. याप्रकरणी डॉ. वैद्य यांच्यावर फौजदारी कारवाई व्हावी यासाठी न्यायालयात खटला दाखल करणार असल्याची माहिती सदर विभागाने दिली आहे. (शहर प्रतिनिधी)सर्व अधिकृत डॉक्टरांनी परवानाधारक औषध विक्रेत्यांकडून औषध खरेदी करावी. एमआर मार्फत खरेदी केलेल्या औषधींची बील घेवे.- डी. आर. गहाणेसहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, भंडारा.