शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

चांदपूर जलाशयात अवैध बोटींग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 22:23 IST

भंडारा जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा तलाव म्हणून चांदपूर तलावाची नोंद आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या नियंत्रणात हा तलाव आहे. परंतु गत सहा महिन्यांपासून या तलावात अवैध बोटींग आणि मासेमारी सुरु आहे. यामुळे पर्यटकांचा जीव धोक्यात आला आहे. सदर व्यवसायाला कुणाचे अभय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देपर्यटकांचा जीव धोक्यात : आयुष्य संपलेली बोट, जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भंडारा जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा तलाव म्हणून चांदपूर तलावाची नोंद आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या नियंत्रणात हा तलाव आहे. परंतु गत सहा महिन्यांपासून या तलावात अवैध बोटींग आणि मासेमारी सुरु आहे. यामुळे पर्यटकांचा जीव धोक्यात आला आहे. सदर व्यवसायाला कुणाचे अभय असा प्रश्न निर्माण झाला आहे.सातपुडा पर्वत रांगांत चांदपूर पर्यटन तथा प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. येथे मोठे जलाशय आहे. शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यानंतर ते पर्यटनासाठी चांदपूर जलाशयावर जातात. विस्तीर्ण जलाशयात सध्या बोटींग सुरु आहे. मात्र ही बोटींग अवैध असून प्रतिव्यक्ती ३० रुपये घेऊन जलसफर घडविली जाते. सुरक्षेची कोणतेही साधन नसताना धोकादायक पद्धतीने बोटींग करण्याचा गोरखधंदा सुरु आहे. या बोटीमध्ये लहान मुले, महिला, तरुण वर्ग सहभागी होतात. बोटींग करणाºयाला प्रशिक्षण नाही. बोटीचे आयुष्यही संपल्याची माहिती आहे. तलाव विस्तीर्ण असून खोल आहे. तलावाचा काही भाग उंच सखल आहे. त्यामुळे बोट खडकावर आदळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.बोटीसोबत येथे अवैध मासेमारी सुरु आहे. मासेमारीचे कंत्राट संपल्याची माहिती आहे. परंतु राजरोसपणे मासेमारी केली जात आहे. स्थानिक कोळी बांधवांची त्यात कमी असून नागपूर येथील दलालांचा समावेश असल्याची माहिती आहे. मासेमारीत लाखोची उलाढाल होत आहे. सदर तलाव राज्यशासनाच्या जलसंपदा विभागाच्या नियंत्रणात असून तुमसर शहरात मुख्य कार्यालय आहे. मात या कार्यालयात शुकशुकाट राहत असल्याने कुणाचेही नियंत्रण दिसत नाही.सिहोरा ठाण्यात दिली होती तक्रारअवैध बोटींग प्रकरणी जलसंपदा विभागाने नोव्हेंबर महिन्यात सिहोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु त्यानंतरही येथे अवैध बोटींग राजरोसपणे सुरु आहे. विशेष म्हणजे या बोटींग व्यवसायाला कुणाचे अभय आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हास्तरावरील संबंधित अधिकारी गप्प का आहेत हा प्रश्न कायम आहे. अपघातानंतर संबंधित विभागाला जाग येईल काय? असा प्रश्न विचारला जात आहे.