शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

साकोली तहसील कार्यालय ईमारत बांधकामात अडथळा

By admin | Updated: November 26, 2014 23:01 IST

मागील दोन तीन वर्षांपासून साकोली तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाविषयी वादविवाद सुरू आहे. अखेर शासनस्तरावरून काम मंजुर झाले आहे. त्यामुळे दोन तीन दिवसांपासून

साकोली : मागील दोन तीन वर्षांपासून साकोली तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाविषयी वादविवाद सुरू आहे. अखेर शासनस्तरावरून काम मंजुर झाले आहे. त्यामुळे दोन तीन दिवसांपासून या कामाला सुरवातही झाली. ग्रामपंचायत सदस्य हेमंत भारद्वाज यांनी हे काम अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हे काम पुर्ववत सुरू केले.साकोली येथील महामार्ग चौपदरी करणाच्या कामानंतर साकोली तहसील कार्यालयाची इमारत गडकुंभली रस्त्यावरील जागेवर तयार करण्यात येणार असे निश्चित झाले. तत्कालीन तहसीलदार राजू रणवीर यांनी जागेसंदर्भात आवश्यक ती कार्यवाही पुर्ण केली. मात्र गावातील काही लोकांनी ही तहसील कार्यालयाची ईमारत आहे त्याच ठिकाणी तयार करा, अशी मागणी केली व स्थगनादेश आणला होता.याला दोन वर्षाचा कालावधी लोटला. आता दोन तीन दिवसापूर्वी गडकुंभली रस्त्यावरील जागेवरच ही इमारत बांधण्याचे काम सुरू करण्यात आले. सध्या या जागेवर जेसीबीच्या सहायाने खोदकाम सुरू आहे. हे काम पाहण्यासाठी आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गाणार व शाखा अभियंता गोबाडे तिथे हजर होते. दरम्यान ग्रा.पं. सदस्य हेमराज भारद्वाज यांनी हे खोदकाम बंद करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती तहसीलदार यांना देण्यात आली. घटनास्थळाला पोलीस निरीक्षक खारतोडे ताफ्यासह पोहचले. त्यांनी काम पुर्ववत सुरू केले. यावेळी नायब तहसीलदार दीनकर खोत, मंडळ अधिकारी बन्सोडे व तलाठीही हजर होते. सरपंच हेमलता परसगडे, महादेव कापगते, नितीन खेडीकर, ललीता खराबे, कोटांगले, शारदा वाडीभस्मे, सविता शहारे आदी त्या ठिकाणी पोहचले. मात्र यावरही काम बंद केले नाही, असे या सदस्याचे मत आहे. (तालुका प्रतिनिधी)