शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

आरोग्य सेविकांची ‘बंधपत्रित’ सेवा खंडीत

By admin | Updated: February 3, 2016 00:40 IST

सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत शासकीय नर्सिंग प्रशिक्षण केंद्रातून एएनएमचे प्रशिक्षण करताना बंदपत्रित करण्यात येते.

शासनाशी लढा सुरु : परिपत्रकानंतरही सेविकांची ससेहोलपटभंडारा : सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत शासकीय नर्सिंग प्रशिक्षण केंद्रातून एएनएमचे प्रशिक्षण करताना बंदपत्रित करण्यात येते. जिल्ह्यातील बंदपत्रित आरोग्य सेविकांना एक दिवसाची तांत्रिक सेवा खंडीत करुन पूर्ववत सेवेत सामावून घ्यायचा शासनाचा निर्देश आहे. मात्र जिल्ह्यातील बंदपत्रित आरोग्य सेविकांची सेवा खंडीत केल्याने त्यांची सेसेहोलपट होत आहे.आरोग्य विभागाच्या अखत्यारितील जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र व उपक्रेंद्रात रिक्त असलेल्या जागेवर या आरोग्य सेविकांची नियुक्ती करण्यात येत असते. त्यासाठी त्यांना आरोग्य विभागाच्या शासकीय नर्सिंग प्रशिक्षण केंद्रातून त्यांना प्रशिक्षण दिल्या जाते. या प्रशिक्षणापूर्वी त्यांच्याकडून शासनाने बंदपत्रित करुन घेतले आहे. यात त्यांना दोन वर्ष शासन सेवा देण्याचे बंधनकारक करण्यात आले. या सेवेनंतर त्यांना एक दिवसाची तांत्रिक सेवा खंडीत करुन त्यांना आरोग्य सेवेत पूर्ववत सामावून घेण्याचे सहसंचालक आरोग्य विभाग यांचे पत्र आहे. मात्र त्यांच्या पत्रानंतरही २००६ पूर्वीच्या बंदपत्रित आरोग्य सेविकांची सेवा बंद करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेकडो आरोग्य सेविकांना याचा फटका बसला आहे. त्यांना सेवेत सामावून घ्यावे यासाठी शासनाचे उंबरठे झिजविले. मात्र शासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. तत्कालीन अवर सचिव सी. पी. राजपूरकर यांनी २ मे २००९ ला अध्याधेश काढून आकृतिबंधामध्ये निश्चित केलेल्या आरोग्य सेविकांना शासन सेवेत सामावून घेण्याचे ग्रामविकास विभागाचे अध्यादेश आहेत. मात्र ग्रामविकास विभाग पदभरती करताना ती परीक्षेच्या माध्यमातून करते. तर आरोग्य विभाग सरळ सेवेतून पदभरती करते. या दोन विभागाच्या विसंगत निर्णयामुळे आरोग्य सेविकांनी बंदपत्रित नंतरही त्यांना सेवेपासून मुकावे लागले आहे. अन्य जिल्ह्यात आरोग्य सेविकांना आरोग्य विभागाने शासन सेवेत नियमित केले असतानाही भंडारा जिल्ह्यातील अनेकांना यापासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत जयसेवा जयलक्ष अन्याय भ्रष्टाचार निराकरण समितीचे सिद्धार्थ गजभिये यांनी माहिती अधिकारात माहिती मागीतली असता ती न देता अर्धवट देण्यात आल्याने सदर प्रकरण उघडकीला आले आहे. (शहर प्रतिनिधी)