शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

आंतरपिकाने आर्थिक प्रगती

By admin | Updated: November 19, 2014 22:34 IST

एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम द्वारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी भंडारा तसेच प्रगती मागासवर्गीय महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने क्लस्टर क्र. ४ येथील

अभ्यास सहलीचे आयोजन : पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम भंडारा : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम द्वारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी भंडारा तसेच प्रगती मागासवर्गीय महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने क्लस्टर क्र. ४ येथील १४ ग्रामपंचायतमध्ये अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले.पॅराग्राम अभ्यास सहल तुमसर येथे बघेडा या गावात नेण्यात आली. बघेडा गावात घेण्यात येत असलेल्या बटाट्यांची पिकांची लागवड मुख्य आकर्षण ठरली. आंतरपिक घेतल्यामुळेच शेती व्यवसाय परवडेल म्हणून संत्र्यांच्या पिकांमध्ये बटाटे, कोहळा, कोबी, वांगे, मिरची इत्यादी आंतरपिक घेतले जातात. गावातील शेतकऱ्यांचे गटाद्वारे १०० एकर चिप्सच्या बटाट्यांची लागवड केली जाते व मोठ्या कारखान्यांना निर्यात केली जातात. शासनावर अवलंबून न राहता गावातील रहिवाशांनी स्वत: पुढाकार घेऊन विकासात्मक कामे करावी असे अभ्यास सहलीद्वारे उपस्थित प्रशिक्षणार्थींना शिकण्यास मिळाले. डव्वा, आमगाव, मांडवी, माटोरा, कवलेवाडा, खमारी बुटी, दिघोरी, बेलगाव, डोडमाझरी, टेकेपार, बेरोडी, करचखेडा, सुरेवाडा, मंडणगाव या १४ गावांची अभ्यास सहल घेण्यात आली. कार्यक्रमात ७०० ते ७५० प्रशिक्षणार्थिंना सहभाग नोंदविला. कार्यक्रमात लोकसहभाग आंतरपिक, पाण्याचे व्यवस्थापन व अभ्यास सहलीचे महत्व याबद्दल भूषण टेंभुर्णे यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना माहिती दिली. समूह संघटक किर्ती डांगे यांनी महिलांचे पाणलोटातील महत्व याबद्दल माहिती दिली. त्यानंतर बघेडा येथे प्रशिक्षणार्थ्यांना शिवारफेरी काढून कोल्हापूरी बंधारा दाखविण्यात आला. यात अनिल भुसारी, गोपीचंद गायकवाड यांनी लोकसहभागातून व नियोजनाने बंधाऱ्याची देखरेख व त्याचे महत्व याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर शेतीनिष्ठ शेतकरी प्रकाश दुर्गे यांनी त्यांच्या शेतात शिवारफेरीतून संत्र्यांचे बाग, बटाटे या पिकांचे व्यवस्थापन, पिकपद्धती याबद्दल माहिती दिली. शेतीत आंतरपिक घेतल्यास निश्चित फायदा होईल असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास बघेडा येथील शेतीनिष्ठ शेतकरी भास्कर भुजाडे, प्रगतीशिल शेतकरी शिवकुमार चौधरी, सुहास तरटे, खुशाल कटरे, नामदेव चौधरी, वसंत तरटे, मधुकर तरटे, राजेश गायकवाड, अशोक ठाकुर, रमेश बिसने रामराल जिवतोडे यांच्या शेतातसुद्धा शिवारफेरी घेण्यात आली.कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य सुरेश रहांगडाले, मंडळ कृषी अधिकारी बी.डी. बावणकर, कृषी सहाय्यक एम.जी. काळे, जिल्हा समन्वयक गणवीर यांनी उपस्थिती दर्शविली. तसेच श्याम ठवकर, मुकेश शेंडे, रजनीकांत बिरणवार यांनी कार्यक्रमात उपस्थित प्रशिक्षणार्थींकडून मुल्यमापन फॉर्म भरून घेतले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिनदयाल बिसने, धुर्वा मांढरे, पप्पू रहांगडाले, सुनिल भुसारी, चंद्रहास भुजाडे, राजू चौधरी, रोशन गोले, दिनकर नागमोते आणि लोकेश चौधरी, निशा अंबादे, लिना माकडे यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)