शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा बदली शिक्षकांचा शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 22:34 IST

अन्यायग्रस्त आंतरजिल्हा बदली कुटुंबियांनी शिक्षणाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षासमोर बुधवारला ठिय्या आंदोलन केले. आज चौथ्या दिवशीही या शिक्षकांचे सहकुटुंब उपोषण सुरू आहे.

ठळक मुद्देसहकुटुंब उपोषण सुरूच : जिल्हा परिषदेत मांडला ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अन्यायग्रस्त आंतरजिल्हा बदली कुटुंबियांनी शिक्षणाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षासमोर बुधवारला ठिय्या आंदोलन केले. आज चौथ्या दिवशीही या शिक्षकांचे सहकुटुंब उपोषण सुरू आहे.२३ नोव्हेंबर २०१६ ला जिल्हा परिषदेत ११७ शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने सामावून घेण्यात आले. त्यामुळे अनेक पात्र शिक्षकांना वंचित राहावे लागले. याविरोधात अन्याय ग्रस्तांनी विभागीय आयुक्तांना न्यायासाठी पाठपुरावा केला. उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली.या प्रकरणात तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी यांची भूमिका संशयास्पद असल्याने विभागीय आयुक्तांनी त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव २८ आॅगस्ट २०१७ ला प्रधान सचिवांकडे पाठविला होता. अद्यापही त्यांचेवर कारवाई झालेली नाही. आता अन्यायग्रस्त बदलीपात्र शिक्षकांना सहकुटुंब उन्हात आमरण उपोषण करण्यासाठी प्रशासनाने भाग पाडल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.४ जूनपासून ३ दिवस होऊनही जिल्हा परिषद प्रशासनाने उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे प्रहारचे जिल्हाध्यक्ष राजेश पाखमोडे, तालुका अध्यक्ष मंगेश वंजारी यांच्या नेतृत्वात अन्यायग्रस्त शिक्षकांच्या कुटुंबियांनी शिक्षणाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. आता आमदार बच्चू कडू यांचेसोबत येत्या दोन दिवसात तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय अन्यायग्रस्त शिक्षकांनी घेतला आहे.