शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

तृष्णा भागविण्याकरिता इंटकवेल

By admin | Updated: April 6, 2017 00:20 IST

तुमसरकरांची तृष्णा भागविण्याकरिता नगरपरिषद प्रशासनाने कंबर कसल्याचे दिसून येत आहे.

तुमसर येथील प्रकार : अध्यक्ष तथा मुख्याधिकाऱ्यांनी केली पाहणीतुमसर : तुमसरकरांची तृष्णा भागविण्याकरिता नगरपरिषद प्रशासनाने कंबर कसल्याचे दिसून येत आहे. मुबलक पाणी उपलब्ध व्हावे याकरिता कोष्टी घाटावर नगराध्यक्ष तथा मुख्याधिकाऱ्यांनी इंटकवेल करिता पाहणी केली. शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता कोष्टी येथे नगरपरिषदेचे पंपहाऊस आहे. सध्या वैनगंगेचे पात्र कोरडे पडले आहे. पंप हाऊसकडे इंटकेवेल करून पाणी वळते करता येते नाही करिता कोष्टी येथे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे, पाणीपुरवठा सभापती मेहताब सिंग ठाकूर तथा तांत्रिक कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. यापूर्वी माडगी येथे इंटकवेल करून नदीपात्रातील पाणी वळते करण्यात आले होते.नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी शहरवासीयांना मुबलक पाणी कसे मिळेल याचे नियोजन करण्याचे निर्देश दिले. शहरातील जलशुद्धीकरण केंद्र दुरूस्ती करण्याची निविदा काढली आहे. उन्हाळ्यात पाण्याची समस्या निर्माण होते, परंतु समस्येवर तोडगा कसे काढता येईल, याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती नगराध्यक्ष पडोळे यांनी दिली.राज्य शासनाला पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. राज्य शासनाची मंजूरी प्राप्त झाल्यावर भविष्यात पाणी संकट येथे नक्कीच दूर होईल. शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता वितरिका तयार करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी दिली. माडगी तथा कोष्टी येथील पंपगृह परिसरात पाणीसाठा राहावा याकरिता इंटकवेल करण्यात येत आहे. येथील पंपगृहही अत्याधुनिक करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असल्याची माहिती पाणीपुरवठा सभापती मेहताब सिंग ठाकूर यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)