शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

रोहयोप्रकरणी खंड विकास अधिकाऱ्यांचे चौकशीचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:05 IST

करडी येथील रोहयो मजुरांना कामे करूनही सन २०१४ पासूनची मजुरी मिळालेली नाही.

ठळक मुद्देमजुरांचे वेतन प्रकरण : विस्तार अधिकारी तेलमासरे यांना जबाबदारी

आॅनलाईन लोकमतकरडी (पालोरा) : करडी येथील रोहयो मजुरांना कामे करूनही सन २०१४ पासूनची मजुरी मिळालेली नाही. रोहयोतील गैरप्रकाराची चौकशी करून दोषींना पदमुक्त करण्यात यावे, इंदिरानगरातील लोकांना घराचे पट्टे देण्यात यावे, अतिगरजुंना घरकुलांचा लाभ देण्यात यावा. मागण्यांसाठी ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला. याप्रकरणी मोहाडी खंड विकास अधिकाºयांनी तत्काळ दखल घेत करडी गावात जावून भेट घेतली. प्रकरणी चौकशी करण्यासाठी विस्तार अधिकारी तेलमासरे यांना जबाबदारी सोपविली. मजुरांना तीन वर्षापासून मजुरीची प्रतिक्षा या शिर्षकाची बातमी प्रकाशित झाल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाल्याने प्रकरणी चौकशीचे निर्देश देण्यात आले.करडी येथील रोहयो मजुरांना कामे करूनही सन २०१४ पासूनची मजुरी मिळालेली नाही. रोहयो अभियंत्याच्या दुर्लक्षित धोरण व निष्क्रीयतेमुळे मजुर त्रस्त आहेत. अभियंता कामाचे ठिकाणी येत नाहीत. कामाचे ठिकाणी मजुरांचया हजेरीचे मस्टर भरले जात नाही. कामाचे मोजमापानुसार मजुरांना त्यांच्या कामाची मजुरी न मिळता अत्यल्प मजूरी दिली जाते. प्रथम मजुराचे भरवस्यावर कामे सोडली जात असून गरजुंना कामावर घेतले जात नाही. कामे केल्यानंतरही त्यांची मजुराचे भरवस्यावर कामे सोडली जात असून गरजूंना कामावर घेतले जात नाही. कामे केल्यानंतरही त्यांची मजुरी काढली जात नाही.कामावर गैरहजर असणाऱ्यांच्या बोगस हजेºया लावण्याचे गैरप्रकार केले जातात. प्रकरणी चौकशी करून अभियंत्याला हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. करडी येथील रोहयो कामात मागील अनेक वर्षांपासून या गैरप्रकाराला खतपाणी देण्याचे काम होत असून गैरप्रकार वाढीस लागल्याने मजूर त्रस्त आहेत. सन २०१४ ते २०१७ या तीन वर्षात शासनाचे मजुरीचे दर अधिक असताना सुद्धा अत्यल्प मजुरी देण्यात आली. सन २०१४ ते २०१७ पर्यंत कामावर गेलेल्या अनेक रोहयो मजुरांना त्यांच्या कामाची मजुरी मिळालेली नाही. काम मागणी नमुना ४ चे फार्म भरून दिल्यानंतरही सुमारे ३ ते ४ वर्षापासून मजुरांचे नाव रोहयो कामाच्या मस्टरमध्ये आलेले नाहीत. एवढेच नाही तर कामावर गेल्यानंतर व दोन ते तीन दिवस कामे केल्यानंतरही मस्टरवर नाव आले नाही. नाव नसल्याचे कारण सांगून कामवरून परत पाठविले जाते. कामावर नसताना बोगस व्यक्तींची हजेरी दिवसाला १०० च्या आसपास लावली जाते, असे आरोप ग्रामस्थांचे आहेत.प्रकरणी चौकशीची मागणी ज्ञानेश्वर ढेंगे, दिलीप पवनकर, कन्हैयालाल मोहतुरे, उमेश शेंडे, अमोल ढबाले, अजय तितिरमारे व ग्रामस्थांनी केली अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा दिला.उपरोक्त मागण्यांप्रकरणी मोहाडी खंड विकास अधिकाºयांनी तत्काळ दखल घेत करडी गावात जावून भेट घेतली. तसेच प्रकरणी चौकशी करण्यासाठी विस्तार अधिकारी तेलमासरे यांना जबाबदारी सोपविली आहे.नवेगावातील १०६ रोहयो मजूर मजुरीविनाकरडी येथील रोहयो मजुरांप्रमाणेच जवळील नवेगाव बुज येथील १०६ रोहयो मजुरांना वर्ष लोटत असताना मजुरी मिळालेली नाही. प्रकरणी खंड विकास अधिकारी मोहाडी यांनी वरिष्ठांना कळविले आहे. मात्र, मार्ग निघालेला नाही. वरिष्ठांमार्फत प्रकरण दिल्ली एनआयसीकडे पाठविण्यात आले आहे. मजुरांचे बँक, पोष्ट खाते बंद असल्यामुळे पहिले आठवड्याचे मजुरी मिळाली नाही. त्यावेळी मजुरांना याची माहिती दिली असता कामे सुरू असतानाच दुसºया आठवड्याचे मजुरी देण्यात आली. मात्र, पहिल्या आठवड्याच्या मजुरीच्या प्रतिक्षेत नवेगाव येथील मजुर आहेत.