शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

संस्थांना संविधान सप्ताह साजरा करण्याचे निर्देश द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 21:42 IST

जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्था व शैक्षणिक संस्था आदींना २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत संविधान सप्ताह साजरा करण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कल्याण महासंघाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्था व शैक्षणिक संस्था आदींना २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत संविधान सप्ताह साजरा करण्याचे निर्देश देण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनानुसार भारतीय संविधान हे राष्ट्रीय एकता एकात्मता व बंधूत्वतेचे तसेच देशाच्या संपन्नतेचे अत्यंत सुंदर व सक्षम असे संविधान आहे. तो भारतीयांचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. समाजाला सन्मानाने जगण्याचे व जगविण्याचे मौलीक अधिकार संविधानात आहे.या सर्व बाबी लक्षात घेऊन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून केंद्र सरकारने २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून देशभर साजरा करण्याचा निर्णय यापूर्वी घेतला आहे.महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निर्णयानुसार २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत राज्यात संविधान सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जागृती होण्याच्या दृष्टीकोनातून भंडारा जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालय, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायती तसेच शैक्षणिक संस्थांना संविधान दिन व संविधान सप्ताह साजरा करण्याच्या सूचना व निर्देश देण्यात यावे अशी मागणी आहे.शिष्टमंडळात महासंघाचे केंद्रीय ज्येष्ठ उपाध्यक्ष अमृत बन्सोड, जिल्हाध्यक्ष गुलशन गजभिये, ज्येष्ठ उपाध्यक्ष अदिनाथ नागदेवे, सचिव नरेंद्र बन्सोड, मुख्य संघटन सचिव रुपचंद रामटेके, मोरेश्वर गेडाम, आनंद गजभिये, उपेंद्र कांबळे, अशोक बन्सोड आदींचा सहभाग होता.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारी