शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

पाणीपुरवठा गावाऐवजी समाजभवनाला

By admin | Updated: May 24, 2017 00:22 IST

डोंगरला येथील सार्वजनिक विहिरींची दुरुस्ती करून मोटारपंप बसवून गावाला पाणीपुरवठा करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने घेतला, ...

माळी समाज संघटनेचा आक्षेप: ग्रामपंचायत तथा पंचायत समितीच्या ठरावात तफावतमोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : डोंगरला येथील सार्वजनिक विहिरींची दुरुस्ती करून मोटारपंप बसवून गावाला पाणीपुरवठा करण्याचा ठराव ग्रामपंचायतीने घेतला, परंतु प्रत्यक्षात पं.स. च्या मासीक सभेत माळी समाज भवन येथे सबमर्शीबल मोटार, पाईप लाईन व पाण्याचा जलकुंभाचे कामाचा ठराव घेण्यात आला. पं.स. च्या सेस फंडातून ही कामे करण्यात आली. येथे माळी समाज संघटनेने असून आम्हाला विश्वासात घेतलेले नाही असा आक्षेप नोंदविला आहे.ग्रामपंचायत तथा पंचायत समितीच्या दोन ठरावात तफावत दिसत आहे. एका ग्रामपंचायत सदस्याने तथा तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष शंकर राऊत यांनी संबंधित कामाची चौकशीची मागणी केली आहे. डोंगरला ग्रामपंचायतीने मासीक सभेत माळी समाज भवन परिसरातील सार्वजनिक विहिरी दुरुस्ती, गाळ काढून विहिरीत मोटारपंप बसवून विहिरीचे पाणी सार्वजनिक जलकुंभात उपसा करून गावाला पाणीपुरवठा करण्याचा बहुमताने ठराव पारीत केला. पंचायत समितीच्या शेष फंडातून निधी खर्च करण्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे. दुसरीकडे तुमसर पंचायत समितीच्या दि. २ डिसेंबर २०१६ च्या मासीक सभेत डोंगरला येथे माळी समाज भवन येथे सबमर्सीबल मोटार, पाईपलाईन व जलकुंभ ही कामे करण्याबाबत ठराव घेण्यात आला. याकरिता सभेत २,००,८९४ चे प्राकलन तयार करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत डोंगरलाचे नावे करारनामा करून कार्यारंभ आदेश तयार करण्यात आला. १०० रुपयाच्या मुद्रांक शुल्कावर सरपंच यांची स्वाक्षरी असून काम करणारी यंत्रणा (कंत्राटदार) ग्रामपंचायत डोंगरला आहे. ग्रामपंचायत सदस्य गणेश राऊत यांनी ग्रामपंचायतीला सदर कामाची ठरावाची प्रतीची मागणी केली. कामाच्या स्थळावर ९ मार्च १०१७ ला कामे पूर्ण रकण्याचा फलक लावण्यात आला. पाणी पुरवठा अभियंत्यांनी काम पूर्णत्वाचे फलक सुद्धा लावले. या कामाची मोजमाप पुस्तिका तसेच कार्यारंभ आदेशाची माहिती ग्रामपंचायतीला नाही. विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नाही असे दस्ताऐवजात नमूद आहे. माळी समाज संघटनेला विश्वासात घेण्यात आले नाही. मंडळाने ग्रामपंचायतीला दस्ताऐवजाची मागणी केली. परंतु ग्रामपंचायतीत कोणतेच दस्ताऐवज उपलब्ध नाही असे खंडविकास अधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद आहे. यावर पाणीपुरवठा अभियंत्यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, ग्रामपंचायतच्या नावे करारनामा करून कार्यारंभ आदेश तयार करण्यात आला. त्यामुळे कामाची सुरुवात पाणी पुरवठा अभियंत्यांनी केली असे म्हणणे योग्य नाही. दि. २० मार्च २०१७ ला डोंगरला येथे आपले समक्ष भेट दिली असता सदर कामे पूर्ण झाल्याचे आढळले. असे पत्रात नमूद केले आहे.महात्मा ज्योतीबा फुले बहुउद्देशिय मंडळ, डोंगरला यांनी सदर कामाबाबत काहीच माहित नाही, कामाबद्दल नाहरकत मंडळाकडून घेतली नाही. सदर मंडळाला संबंधित कामांचे दस्ताऐवज पुरविण्याची मागणी केली आहे.येथे गावाला पाणी पुरवठा करण्याचे भासविण्यात आले आहे. या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी तुमसर तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष शंकर राऊत यांनी केली असून नियमबाह्य कार्य करणाऱ्यांच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.या प्रकरणाची फाईल माझ्याकडे उपलब्ध नाही. पाणीपुरवठ्याचा विषय असल्याने संबंधित विभागाच्या अभियंत्यांकडून माहिती जाणून घ्यावी लागणार आहे.-व्ही.के. झिंगरे, खंडविकास अधिकारी, तुमसर.डोंगरला येथे माळी समाज भवन येथे सबमर्सीबल मोटार, पाईप लाईन व पाणी टाकी कामाचे ठराव पं.स. च्या मासीक सभेत घेण्यात आला. त्या अनुषंगाने कार्यारंभ आदेश तयार करण्यात आला. मासिक सभेतील निर्णयाची अंमलबजावणी नियमानुसार करावी लागते.-धनंजय बावनकर, उपविभागीय अभियंता, पाणीपुरवठा उपविभाग, तुमसर.