शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या कार्यातून प्रेरणा घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:44 IST

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे योगदान आहे. देश अखंड ठेवण्यात त्यांची कामगिरी मोठी आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : राष्ट्रीय एकतेसाठी धावले भंडारा शहर, राष्ट्रीय एकता दिवस व संकल्प दिवस साजरा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे योगदान आहे. देश अखंड ठेवण्यात त्यांची कामगिरी मोठी आहे. सगळ्यांना एकाच धाग्यात गुफण्याचं काम त्यांनी केले. सरदार या नावातच नेतृत्वगुण दिसून येतात. म्हणूनच आज राष्ट्रीय एकता दिनाचे व राष्ट्रीय संकल्प दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन आपले जीवन समृद्ध करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय एकता दिवस व राष्ट्रीय संकल्प दिवस कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, पोलीस उपअधीक्षक सुनील कुळकर्णी, उपजिल्हाधिकारी दिलीप तलमले, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, तहसीलदार संजय पवार, अधीक्षक वरूण शहारे उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, १९७१ च्या युध्दात संपूर्ण जगास विस्मयकारक राजकीय निर्णय घेऊन पाकिस्तान व बांगला देशसोबतच्या युद्धात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. या कठोर निर्णयाबदद्दल त्यांना ‘आयर्न लेडी’ म्हटले जाते. या दोन्ही नेत्यांना स्मरण करण्यासाठी आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे सांगितले. या महान नेत्यांचे चरित्र तरूणांनी व विद्यार्थ्यांनी वाचून त्यांचे गुणकर्तृत्व आत्मसात करावे, असे त्यांनी सांगितले. आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस तर इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय संकल्प दिवस साजरा करण्यात आला.मंगळवारला सकाळी महात्मा गांधी चौक ते जिल्हा क्रिडा संकुलापर्यंत एकता दौडचे आयोजन करण्यात आले. या दौडला जिल्हाधिकारी सुहास दिवसे व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केले. या दौडमध्ये विद्यार्थ्यांनी व खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यात विविध क्रीडा संघटना सहभागी झाल्या होत्या. एकता दौडचा समारोप जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे संचालन क्रीडा अधिकारी अनिराम मरसकोल्हे यांनी तर उपस्थितांचे आभार दिलीप ईटनकर यांनी मानले.