शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय चमूकडून कामाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 22:18 IST

केंद्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारला जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची पाहणी केली.

ठळक मुद्देधोप येथे मनरेगाची पाहणी : दोन सदस्यीय चमूशी जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा

आॅनलाईन लोकमतभंडारा : केंद्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारला जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची पाहणी केली. कार्यक्रम अधिकारी श्रुती सिंग व अनिलकुमार कट्टा या दोन अधिकाऱ्यांचा या चमूमध्ये समावेश होता. या अधिकाऱ्यांनी मोहाडी तालुक्यातील धोप येथील मनरेगा कामाची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, मनरेगाचे सहाय्यक आयुक्त कमलकिशोर फुटाणे, मोहाडीचे तहसीलदार सूर्यकांत पाटील, मनरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल निकम, खंडविकास अधिकारी आर.एम.दिघे व अधिकारी उपस्थित होेते.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुशासन व सामाजिक अंकेक्षण करण्याच्या अनुषंगाने ही चमू जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली होती. या दौऱ्यात जनमाहिती फलक, केस रेकॉर्ड, वर्क फाईल, ग्रामपंचायतस्तरावर ७ रजिस्टर ठेवणे, जॉबकार्ड डिजाईन व तपासणी या विषयाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. मोहाडी येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत धोप येथे पांदण रस्ता, सिमेंट रस्ता वृक्ष लागवड, सिंचन विहिर, पंतप्रधान आवास योजनेच्या कामाची पाहणी केली. या चमूने मजुरांशी चर्चाही केली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात या चमूने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काशिनाथ तरकसे, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे उपस्थित होते. जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मनरेगाबाबत सादरीकरण करून माहिती दिली. भंडारा जिल्हा हा वेळेत मजुरी देण्यामध्ये राज्यात पहिला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी चमूला सांगितले.