शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मिश्र रोपवन व मध्यवर्ती रोपवाटिकेची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 23:30 IST

जुलै महिन्यामध्ये लावलेल्या वृक्षांची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी अर्जुनी-मोरगाव परिक्षेत्रातील मिश्र रोपवन झरपडा व मध्यवर्ती रोपवाटिका मालकनपूर येथे भेट दिली.

ठळक मुद्देप्रोत्साहन : जिल्हाधिकाºयांची झरपडा व मालकनपूरला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : जुलै महिन्यामध्ये लावलेल्या वृक्षांची पाहणी करण्याकरिता जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी अर्जुनी-मोरगाव परिक्षेत्रातील मिश्र रोपवन झरपडा व मध्यवर्ती रोपवाटिका मालकनपूर येथे भेट दिली. तसेच वृक्ष वाढीची प्रत्यक्ष पाहणी केली.जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे ग्रामीण भागातील खरे वास्तव चित्र जवळून पाहण्यासाठी तसेच गावखेड्यातील सामान्य जनतेशी समरस होऊन त्यांच्याशी हितगूज साधून गावाचा विकास होण्याच्या हेतूने ग्रामीण क्षेत्रात भेटी देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्याद्वारे निश्चितच सामान्य मानसाला पाठबळ देत आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तसेच प्रदूषणावर आळा बसावा म्हणून गावागावात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करुन त्यांचे संवर्धन करावे. आपल्या सानिध्यातील वृक्षांची लागवड तसेच फळवृक्ष लागवड व्हावी, हा त्यांचा हेतू आहे.अर्जुनी-मोरगाव येथे ४ कोटी वृक्ष लागवड अंतर्गत १ जुलै रोजी लागवड करण्यात आलेल्या मिश्र रोपवन झरपडा या ठिकाणी जिल्हाधिकारी काळे यांनी भेट देऊन रोपवनबद्दलची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी त्यांच्यासोबत जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे उपस्थित होते. रोपवनाला भेट दिल्याबद्दल जिल्हाधिकारी काळे यांचे, वनपरिक्षेत्राधिकारी रहांगडाले यांनी रोपटे देऊन स्वागत केले. वनपरीक्षक पी.के. ब्राम्हणकर यांनी जिल्हाधिकाºयांना रोपवनाबद्दल माहिती देताना सांगितले की, मिश्र रोपवन झरपडा येथे ४ कोटी वृक्ष लागवड अंतर्गत गोसे संरक्षीत वन कक्ष क्रं. ४६४०६५ मधील १५ हेक्टरमध्ये १६ हजार ६६५ वृक्षांची लागवड श्रमदानातून करण्यात आली. आजघडीला ३ ते ५ फुट रोपांची उंची वाढलेली असल्याचे त्यांनी जिल्हाधिकाºयांच्या लक्षात आणून दिले.सदर रोपवनात विविध जातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. रोपवनाची झालेली वाढ पाहून जिल्हाधिकाºयांनी समाधान व्यक्त केले. तसेच रोपवनात आपल्या सानिध्यातील वृक्ष तसेच फळ देणाºया वृक्षांची लागवड करावी, असे मनोगत व्यक्त केले.