शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवडीची चौकशी मंत्रालय अधिकाºयांकडून होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 21:49 IST

तालुक्यातील सामाजिक वनीकरणात वृक्ष लागवड तथा उत्तमराव पाटील उद्यानात खर्च केलेल्या निधीत घोळ दिसत असून जिथे उद्यान तयार करण्यात आला ती जागा मुरमी व तिथे उधईचे वास्तव्य असल्याची माहिती उघडकीस आली आहे.

ठळक मुद्देडोंगरला येथील प्रकार : अधिकाºयांकडून सावरासावर करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तालुक्यातील सामाजिक वनीकरणात वृक्ष लागवड तथा उत्तमराव पाटील उद्यानात खर्च केलेल्या निधीत घोळ दिसत असून जिथे उद्यान तयार करण्यात आला ती जागा मुरमी व तिथे उधईचे वास्तव्य असल्याची माहिती उघडकीस आली आहे. उद्यानास उपयोगी असणाºया जागेची निवड कशी करण्यात आली हा प्रश्न उपस्थित झाला आहे. येथील अनियमितता प्रकरणाची चौकशी मुंबई येथील मंत्रालयाचे अधिकारी करणार असल्याची माहिती आहे.तुमसर तालुक्यात सामाजिक वनिकरण विभागांतर्गत डोंगरला, रनेरा, पचारा, मोहगाव, तुमसर- डोंगरला रस्त्याशेजारी वृक्ष लागवड करण्यात आली. डोंगरला येथे रोपवाटिका सामाजिक वनीकरण विभागाची आहे. डोंगरला गावाशेजारी रस्त्याशेजारी स्व.उत्तमराव पाटील उद्यान २४ हेक्टर जागेत तयार सुरु आहे.याकरिता शासनाकडून टप्प्याटप्प्याने दोन कोटी रूपयांचा निधी मिळत आहे. पंरतु येथे कुंपनच शेत खात असल्याचे समोर येत आहेत. वृक्ष लागवडीचा निश्चित कालावधी राज्य शासनाने ठरवून दिला आहे. जुलै ते आॅगस्ट दरम्यान वृक्ष लागवड करता येते. येथे चार दिवसापूर्वी उद्यानात वृक्ष लागवड करण्यात आली.येथे उद्यान नावापुरते दिसत आहे. उद्यानाचा २४ हेक्टर परिसर हा मुरमी जागा आहे. येथे झाडांना पोखरुन टाकणाºया उधई मोठ्या प्रमाणात आहे. या जोगवर झाडांची वाढ धिम्म्या गतीने होते. त्यामुळे उद्यानातील वृक्षांची कशी वाढ होणार हा प्रश्न आहे.वृक्ष लागवड निधीची माहिती दर्शनी फलकावर चौकशीच्या भितीने लिहिण्यात आली. सामाजिक वनीकरणाचे वनपरिक्षेत्रधिकारी एफ.एम. राठोड व उपवनसंरक्षक योगेश वाघाये यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. उद्यानाच्या कामावर स्थानिक वनपरिक्षेत्राधिकारी यांचे ९० टक्के कामावर देखरेख व नियंत्रण असते तर १० टक्के निरीक्षण जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकारी पाहतात अशी माहिती आमदार चरण वाघमारे यांनी दिलेल्या पाहणी व भेटी दरम्यान उपवनसंरक्षक वाघाये यांनी दिली.वनमंत्रालयाने उद्यानाकरिता दिलेला दोन कोटींचा निधी असा वाया जाणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. येथे केवळ वनपरिक्षेत्राधिकारी यांना दोष ठरवून वरिष्ठ अधिकारी जबाबदारीतून मुक्त होऊ शकत नाही. सामाजिक कार्यकर्ता प्रा.कमलाकर निखाडे यांनी या संपूर्ण प्रकरणाची तक्रार आपले सरकार पोर्टलवर केली आहे. या विभागांतर्गत सर्वच कामांची माहिती अधिकारांतर्गत मागीतली आहे. त्यामुळे हा संपूर्ण विभाग खळबडून जागा झाला आहे.