शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

शासकीय सुटीमुळे चौकशीत विलंब

By admin | Updated: October 16, 2015 01:09 IST

पंचायत समितीच्या आवारातील मागील जागेवरील रोजगार हमी योजनेअंतर्गत शासकीय वृक्ष बेकायदेशिररित्या तोडण्यात आले होते.

बीडीओंनी दिले पत्र : प्रकरण बेकायदेशीर वृक्षतोडीचेतुमसर : पंचायत समितीच्या आवारातील मागील जागेवरील रोजगार हमी योजनेअंतर्गत शासकीय वृक्ष बेकायदेशिररित्या तोडण्यात आले होते. त्यामुळे सदर कंत्राटदारावर ठराविक कालावधीत कारवाईची करा अन्यथा उपोषणावर बसण्याचा इशारा भाजपच्या गटनेत्याने दिला होता. त्यावर खंडविकास अधिकाऱ्याने शासकीय सुटीचा निवाडा देऊन चौकशीत विलंब झाल्याचे स्पष्टीकरण देत उपोषणाला न बसण्याची विनंती केली आहे. तुमसर पंचायत समितीच्या आवारात मागील बाजूला मांगली ग्राम पंचायततर्फे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ४ वर्षापूर्वी नर्सरी रोपवाटिकेत ५०० वृक्ष लागवड करण्यात आले होते. सदर नर्सरीही ३ लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आली होती. नियमित नर्सरीच्या देखरेखीमुळे नर्सरीतल्या वृक्षांची बऱ्यापैकी वाढ झाली होती. दरम्यान त्या नर्सरीलगत महिला बचतगट विक्री केंद्राची इमारत बांधकामाला मंजुरी मिळाली होती. त्यामुळे सदर कंत्राटदाराने मशीनद्वारे जमिनीचे खोदकाम करून त्यातील संपूर्ण मातीचा ढीग त्या नर्सरीत टाकल्याने ४ वर्षाचे मोठमोठे वृक्ष मातीत दाबल्या जावून पुर्णत: नर्सरी नष्ट केल्याची बाब उघडकीस येताच पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपुरे यांनी मासिक सभेत कंत्राटदाराकडून बेकायदेशिररित्या तोडलेल्या वृक्षांची लागवडीसह मोबदला द्यावा तसेच त्याच्याविरुद्ध कारवाई करावी, असा ठराव घेण्यात आला. त्या ठरावाची आठ दिवसात चौकशी करून कारवाई न केल्यास उपोषणावर बसण्याचा इशारा त्यांनी दिला होता. दरम्यान १० ते १२ आॅक्टोबरपर्यंत शासकीय सुटी असल्यामुळे या प्रकरणावर कारवाईकरिता वेळ कमी मिळाला असल्याचे लेखी पत्र देऊन चौकशीसाठी आणखी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे उपोषण तुर्तास मागे घेण्यासंबंधी खंडविकास अधिकारी केशव गड्डापोड यांनी विनंती केली आहे. (शहर प्रतिनिधी)