शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

बनावट धनादेश स्वाक्षरी प्रकरणी चौकशी सुरू

By admin | Updated: January 22, 2015 00:34 IST

मच्छेरा येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे बनावट स्वाक्षरीचे धनादेश प्रकरणी सिहोरा पोलिसांची चौकशी सुरू झाली आहे. यात सचिवाचे बयान नोंदविण्यात आले आहे.

चुल्हाड : मच्छेरा येथील ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे बनावट स्वाक्षरीचे धनादेश प्रकरणी सिहोरा पोलिसांची चौकशी सुरू झाली आहे. यात सचिवाचे बयान नोंदविण्यात आले आहे. यामुळे हे प्रकरण चांगलेच तापणार असल्याचे दिसून येत आहे.मच्छेरा येथील ग्रामीण पाणीपुरवठा योजनेचे कंत्राटदार तथा साहित्य पुरवठाधारकांना देयकाचे धनादेश देताना माजी अध्यक्षाची बनावट स्वाक्षरी धनादेशावर करण्यात आली आहे, असा आरोप माजी अध्यक्ष नोकेश्वर पारधी यांनी केला आहे. या आधी २७ आॅक्टोबर व ६ डिसेंबर २०१४ चे प्रत्येकी १० हजार रूपयाचे धनादेश सिहोऱ्याच्या बँक आॅफ इंडिया शाखेतून वटविण्यात आले आहेत. यानंतर २४ डिसेंबर २०१४ ला पुन्हा १२ हजार रूपयाचा धनादेश वटविण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. परंतु या धनादेशवर माजी अध्यक्ष नोकेश्वर पारधी यांनी स्वत:ची स्वाक्षश्री नसून बनावट असल्याने आक्षेप घेतला असता, सदर धनादेश वटविण्यात आलेला नाही. ज्या पुरवठा धारकांनी साहित्य दिले नाही अशा पुरवठा धारकाच्या नावाने ही धनादेश देण्यात आली आहेत. असा आरोप माजी अध्यक्ष पारधी यांनी केला आहे. दरम्यान, २४ डिसेंबर २०१४ च्या १२ हजार रूपयाच्या धनादेशावर बनावट स्वाक्षरी असल्याने हा धनादेश वटविण्यात आलेला नाही. यामुळे या धनादेशवर बनावट स्वाक्षरी कुणी केली, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. दरम्यान सदर धनादेश कुठे आहे. हा आता शोधाचा विषय ठरणार आहे.दरम्यान, पाणीपुरवठा योजनेचे सचिव सुरज टेंभरे यांना पोलिसांनी चौकशी करीता बोलाविले आहे. बँक आॅफ इंडिया शाखेत पोलिसांनी पत्र व्यवहार करण्यास सुरूवात केली आहे. बनावट स्वाक्षरी धनादेश प्रकरणात पोलिसांचा समेमिरा सुरू झाल्याने यात सहभाग असणारेचे धाबे दणाणले आहेत. चौकशीअंती सत्य पुढे येईलच. (वार्ताहर)