शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

अन्यायग्रस्त ठेवीदारांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 22:19 IST

कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या जेएसव्ही डेव्हलपर्स आणि जय विनायक बिल्डकॉर्प कंपनीच्या संचालकांना तत्काळ अटक करावी. तसेच ठेवीदारांचे पैसे परत द्यावे या मागणीसाठी येथील हुतात्मा चौकातून जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

ठळक मुद्देकोट्यवधींची फसवणूक : जेएसव्ही डेव्हलपर्स, जय विनायक बिल्डकॉर्पचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या जेएसव्ही डेव्हलपर्स आणि जय विनायक बिल्डकॉर्प कंपनीच्या संचालकांना तत्काळ अटक करावी. तसेच ठेवीदारांचे पैसे परत द्यावे या मागणीसाठी येथील हुतात्मा चौकातून जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.सदर कंपनीने भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना दामदुप्पट रकमेचे प्रलोभन देऊन २५ हजार कोटी रूपयांनी फसवणूक केली आहे. सदर कंपनीच्या संचालकांविरोधात ६ सप्टेंबर २०१६ रोजी भंडारा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून करण्यात आला. यातील काही आरोपींना अटक करण्यात आली तर अनेकजण आजही पोलिसांच्या हाती लागले नाही. जेएसव्ही डेव्हलपर्स इंडिया आणि जय विनायक बिल्डकॉर्प या कंपनीच्या नावाने असलेली संपत्ती जप्त करण्याची मागणी करात नागपूर हिवाळी अधिवेशनावर दोनदा मोर्चा काढण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने ८ फेब्रुवारी २०१८ रोजी भंडारा अप्पर जिल्हाधिकाºयांची सक्षम प्राधिकारी म्हणून नियुक्ती करून मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले.मात्र अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप कुठलही कार्यवाही केलेली नाही. ठेवीदारांना त्यांची रक्कम परत मिळालेली नाही. अखेर ठेवीदारांनी येथील हुतात्मा स्मारक चौकातू जिल्हा कचेरीवर मोर्चा काढला. सामाजिक कार्यकर्ता विष्णुदास लोणारे, कन्हैया नागपुरे, मधुकर येरपुडे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चात ठेवीदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांना निवेदन देण्यात आले. त्यात ठेवीदाराची रक्कम तात्काळ परत देण्याची कार्यवाही करवी, पसार आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. या मागण्या पूर्ण न झाल्यास येणाºया २०१९ च्या निवडणुकीत सर्व जिल्ह्यातील ठेवीदार बहिष्कार घालतील, असा इशारा देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी शांतनु गोयल यांनी सदर प्रकरण समजून घेत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ माहिती घेऊन पुढील कार्यवाहीसाठी शासनाला पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तसेच लवकरात लवकर रक्कम परत मिळण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासनही दिले.त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा घेऊन मोर्च्याचा समारोप करण्यात आले. यावेळी डॉ. राजकुमार बावणकर, ममता सांडेल, अनिता मुर्ती, नलु सेलोकर, ममता साखरे, केशोराव बिसने, ज्ञानेश्वर गजभिये या ठेवीदारांनी आपले मनोगत व्यक्त केले. या मोर्च्याला यशस्वीतेयसठी फुलवंता कोकुडे, जागृती गजभिये, मंगला सातके, अरविंद प्रधान, पुष्पा पटले, जगदीश जनबंधू, लेकचंद लुसेसरी यांनी परिश्रम घेतले. मोर्चात अनेकजण सहभागी झाले होते.