शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक निरीक्षकांनी केली मेहता हॉटमिक्स प्लाँटची चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 23:54 IST

तालुक्यातील चारगाव येथील मेहता हॉटमिक्स प्लाँटमध्ये टाकी साफ करीत असताना दोन मजुरांचा भाजून मृत्यू झाला.

ठळक मुद्देमदतीची मागणी : अहवालानंतर ठरणार कारवाईची दिशा

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यातील चारगाव येथील मेहता हॉटमिक्स प्लाँटमध्ये टाकी साफ करीत असताना दोन मजुरांचा भाजून मृत्यू झाला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी नागपूरहून औद्योगिक निरीक्षकांनी प्लाँटची चौकशी केली. या चौकशी अहवालानंतर पुढील कारवाईची दिशा ठरणार आहे. दरम्यान, आंबेडकर सेंटर फॉर जस्टीस अ‍ॅण्ड पीस या संघटनेने प्लाँट मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा मागणीचे निवदेन साकोली पोलीस ठाण्यात दिले आहे.साकोली तालुक्यातील चारगाव फाट्याजवळ असलेल्या मेहता यांच्या हॉटमिक्स प्लाँटमधील एलडीओची टाकी साफ करताना अनामिक उके व विकास ब्राम्हणकर या दोन मजुरांचा भाजून मृत्यू झाला. या प्रकरणाची साकोली पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही पोलिसांनी मर्ग दाखल केला. सदर प्रकरण हे औद्योगिक क्षेत्रात येत असल्याने या प्रकरणाची चौकशी औद्योगिक निरीक्षकांकडून करून तसा अहवाल साकोली पोलिसांनी मागितला. त्यावरून नागपूर येथील औद्योगिक निरीक्षक यांनी घटनेच्या दुसऱ्याच दिवशी घटनास्थळाला भेट देऊन साकोली पोलिसांना अहवाल देणार आहेत. या अहवलाावरून साकोली पोलीस पुढील कारवाई करतील अशी माहिती पोलीस निरीक्षक पिपरेवार यांनी दिली.ठाणेदारांना निवेदनएस.के. मेहता प्लाँट हे चारगाव फाट्यावर मागील १५ वर्षांपासून सुरु आहे. या प्लाँटवर ४० ते ५० मजूर नियमित काम करीत असून या प्लाँवर १०० अश्वशक्तीचे विद्युत संच आहे. या प्लाँटवर २० ते ३५ अश्वशक्तीचे चार मोटार कार्यरत आहेत. असे असतानाही फॅक्ट्री अ‍ॅक्ट २ आॅक्टोबर १९९८ च्या नुसार हे प्लाँट फॅक्टरी अ‍ॅक्टनुसार नोंदणीकृत नाही. या प्लाँटमधून मागील १५ वर्षात कोट्यवधीचा व्यवसाय झाला असून हा महसूल बुडविण्यात आला आहे. याठिकाणी मजुरांचे मस्टर भरले जात नाही. पीएफ व इपीएफ कामगार आयुक्तांकडे जमा केला नाही. मागील आठ ते नऊ वर्षांपासून प्लाँटवरील मशीन टँक स्वच्छ केलेल्या नाही. अनामिक उके याला केवळ चार हजार रूपये महिना देण्यात येत होता. या प्लाँटवर आरोग्यासंबंधी खबरदारीच्या कोणत्याही सुविधा नसल्याने मेहता यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असून यास फॅक्टरीमालक जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे मेहता यांच्याविरूद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृतकाच्या कुटुंबाला फॅक्टरी अ‍ॅक्टनुसार २५ लाख रूपयांची मदत देण्यात यावी, अशी मागणी आंबेडकर सेंटर फॉर जस्टीस अ‍ॅण्ड पीसतर्फे विलास मेश्राम, कैलाश गेडाम, जयशंकर मेश्राम यांनी केली आहे.