शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

जिल्ह्यात जनावरांची बिनधास्त तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 06:00 IST

देशातील गौरक्षण समिती व अनेक गौरक्षक संघटन व गौभक्तांच्या अथक प्रयत्नामुळे गौवंश हा या प्रतिबंधात्मक कायद्याची निर्मिती करण्यात आली़ मात्र, या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन अपयशी ठरत आहे़ प्रमाणिकरित्या काम करणाऱ्या गौरक्षण संस्थांना पोलीस प्रशासन सहकार्य करीत नसल्यामुळे गौवंश तस्करांचे व्यवसाय बिनधास्त सुरू आहे़ .........

ठळक मुद्देपोलिसांचे दुर्लक्ष : वाहनाची नोंद घेऊन वाहन परवाने निलंबित अथवा रद्द करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील गोवंश परप्रांतातील कत्तलखान्यात पोहोचविण्याकरिता देशात सर्वात सुरक्षित क्षेत्र भंडारा जिल्हा असल्याचे निदर्शनास येत आहे. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात गौवंश तस्करी होत असल्याचे चित्र आहे़ हा गोरखधंदा पोलीस प्रशासनाच्या अघोषित संगणमताने गत अनेक वषार्पासून सुरू आहे़भंडारा व गोंदिया जिल्ह्यात मध्यप्रदेशात व छत्तीसगढ राज्याच्या सिमा लागून आहेत़ या राज्यातही गोवंशबंदी कायद्याच्या कठोर अंमलबजावणीमुळे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सानगडी, झाडगाव, बरडकिन्ही, एकोडी (किन्ही). लाखांदूर तालुक्यातील मासळ, लाखांदूर बाजार, दिघोरी (मोठी). पवनी तालुक्यातील निष्टी, सिंदपुरी, तिरखुरी (अड्याळ), सौंदड पुनर्वसन, कोंढा (बाजार) आदी ठिकाणी गोवंश जनावरे संग्रहीत केली जातात़ तेथून मोठ्या ट्रक व पिकअपमध्ये निर्दयतेने कोंबून हैद्राबाद, अदिलाबाद, गणेशपूर तसेच नागपूर व कामठी येथील कत्तलखान्यात पाठविली जातात.़ मध्यप्रदेश व छत्तीसगढच्या सीमेवरून अंतर्गत ग्रामीण मार्गावरून पायी ही जनावरे आणली जातात़तेथून लहान मोठ्या वाहनाद्वारे उपरोक्त निर्देशित ठिकाणी संग्रहीत करून हैद्राबाद, गणेशपूर, नागपूर व कामठी येथील कत्तलखान्यात पाठविली जाते़ या तस्करीमध्ये पोलीस विभागाची सक्रीय भूमिका असल्याचे बोलले जाते़देशातील गौरक्षण समिती व अनेक गौरक्षक संघटन व गौभक्तांच्या अथक प्रयत्नामुळे गौवंश हा या प्रतिबंधात्मक कायद्याची निर्मिती करण्यात आली़ मात्र, या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन अपयशी ठरत आहे़ प्रमाणिकरित्या काम करणाऱ्या गौरक्षण संस्थांना पोलीस प्रशासन सहकार्य करीत नसल्यामुळे गौवंश तस्करांचे व्यवसाय बिनधास्त सुरू आहे़ या उलट बनावट व अघोषित गौरक्षक व काही स्वार्थी प्रवृत्तीच्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गौवंश तस्करांना व्यवसायासाठी तस्करी करण्याकरिता पोलिसांचे अघोषित संरक्षण प्राप्त आहे़ यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण होत असून प्रमाणिक गौरक्षण संस्था मात्र, संपुष्टात येत आहेत़ अवैधरित्या गोवंश तस्करी करणारे व्यवसायी सानगडी, लाखांदूर, मासळ, पौनी, अड्याळ, भंडारा, लाखनी, बरडकिन्ही, साकोली या परिसरातील असल्याने तस्करीकरिता सोयीचे ठरते़अघोषित गौरक्षक व पोलीस यांच्याशी आर्थिक हितसंबंध साधून जवळपास ७० ते ८० लहान मोठ्या वाहनातून ग्रामीण व राष्ट्रीय महामार्गावरून गोपनीय पद्धतीने ही तस्करी केली जाते़गौवंश तस्करी वाहतूक करताना वाहनावर पोलीस कारवाई केल्यानंतर गौरक्षण संस्था आमच्या संस्थेला जनावरे मिळविण्याकरिता पोलिसांसी सौदेबाजी करतात जी गौरक्षण संस्था जास्त पैसे देते त्यांना जप्त केलेली जनावरे दिली जातात़. वाहन न्यायालयीन प्रक्रियेतून सुटून जाते.़ जप्त झालेली जनावरे गौरक्षण संस्थेला प्राप्त झाल्यानंतर तीच जनावरे गौतस्करांना जास्त किमतीत विकली जाते़ गौरक्षण समितीला प्राप्त झालेली जनावरे संस्थेच्या रेकार्डमध्ये नोंद सुद्धा करण्यात येत नाही़ ज्या जनावरांची नोंद झालीच तर त्याची विल्हेवाट लावण्याकरिता जनावरे मृत दाखवून पशु वैद्यकीय अधिकाºयांचे बोगस प्रमाणपत्र देवाण घेवाण करून रेकार्डला दाखविण्यात येते़गौरक्षण संस्था पोलीस प्रशासन व गौतस्कर यांच्या संगणमताने कोट्यवधींची उलाढाल होते़ या तस्करीमध्ये जिल्ह्यातील उच्चपदस्थ संबंधित अधिकाºयांनी गौरक्षण संस्थेच्या कारभाराकडे डोळेझाक केल्याचे उल्लेखनीय आहे़तसेच गौवंश तस्करी करणारे वाहन न्यायालयीन प्रक्रियेतून सुटल्यानंतर पुन्हा तस्करीच्या व्यवसायात लागतात़ असा गुन्हा दाखल झालेल्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी वाहनाची नोंद घेऊन वाहन परवाने निलंबित अथवा रद्द करावीत, जेणेकरून गोवंश तस्करीच्या वाहतुकीवर प्रतिबंध होईल, असे सुजान गोवंश प्रेमींची मागणी आहे़.जिल्ह्याच्या प्राणी संरक्षण समितीने गंभीर दखल घेतल्यास गौवंशची तस्करी होणार नाही़ शासनस्तरावर प्रत्येक गौशाळेला प्रती जनावराकरिता वृद्धाश्रमाच्या आधारावर अनुदान दिल्यास गौवंशाचे संगोपन योग्यरित्या होईल़. प्रामाणिकरित्या काम करणाºया गौरक्षण संस्थांना प्रशासन सहकार्य करीत नसून भ्रष्ट संस्थांना पाठीशी घालत आहे. गौशााळा व गौरक्षकांवर गुन्हे दाखल झाल्याने तस्करांचे हौसले बुलंद आहेत़ पशुधन वाचविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रारासारख्या चारा छावण्या व संगोपन अनुदान सारखे उपक्रम विदर्भात शासनाने सुरू करणे गरजेचे आहे़ गोवंश बंदी कायद्याच्या अंमलबजावणसाठी पोलिसांनी भ्रष्ट वृत्तीचा त्याग करून परिवहन विभागाच्या माध्यमातून तस्करी करणाºया वाहनाचे परवाने रद्द करावे़.-यादोराव कापगते, अध्यक्ष, मातोश्री गौरक्षण संस्था, रेंगेपार (कोहळी)