शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
3
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
4
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
5
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
6
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
7
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
8
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
9
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
10
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
11
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
12
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
13
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
14
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
15
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
16
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
17
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
18
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
19
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
20
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!

भंडाऱ्यात फडकला स्वतंत्र विदर्भाचा झेंडा

By admin | Updated: May 2, 2017 00:51 IST

महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर विदर्भराज्य आघाडीतर्फे स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकावून रक्ताक्षरी अभियानाला आजपासून प्रारंभ करण्यात आला.

सहनशीलतेचा अंत पाहू नका : ‘वीरा’च्या रक्ताक्षरी अभियानात महिलांचा उत्स्फूर्त सहभागभंडारा : महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर विदर्भराज्य आघाडीतर्फे स्वतंत्र विदर्भाचा झेंडा फडकावून रक्ताक्षरी अभियानाला आजपासून प्रारंभ करण्यात आला. आमचं हे रक्ताचं बलिदान म्हणजे स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीची नांदी आहे. आता विदर्भ घेण्यापासून कुणीही रोखू शकत नाही असा इशारा ‘वीरा’चे भंडारा जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. पदमाकर टेंभूर्णीकर यांनी दिला. येथील त्रिमूर्ती चौकात वीरा तर्फे घेण्यात आलेल्या जाहीर सभेत बोलत होते. कार्यक्रमाची सुरवात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून झाली. त्यानंतर विदभार्चा झेंडा फडकवून राष्ट्रगीताचे गायन झाले. कर्ज व नापिकीपायी विदर्भात ३५००० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्या रोखण्यासाठी स्वतंत्र विदर्भ होणे गरजेचे आहे. विदर्भाची ओळख फार जुनी आहे. राजकीय स्वार्थापोटी विदर्भाला संयुक्त महाराष्ट्रात सामील करण्यात आले. राज्य पुनर्निर्माण आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती धर यांनी स्वतंत्र विदर्भ राज्याची शिफारस केली होती. परंतु त्याचवेळी मुंबईसह महाराष्ट्र निर्मितीची चळवळ सुरु होती. विदर्भ वेगळा झाल्यास मुंबई गुजरातमध्ये सामील होईल. संयुक्त महाराष्ट्राच्या दावणीला बांधल्या गेलो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कुपोषण, भारनियमन, बेरोजगारी, गरिबी आमच्या वाट्याला आली. पश्चिम महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला. आता बस झालं "रक्ताक्षरी" ने आमची बलिदानाच्या दिशेने तयारी सुरु झाली. येत्या केंद्रीय अधिवेशनात स्वतंत्र विदर्भाचा ठराव पारित करावा असे आवाहन त्यांनी केले.पूर्व विदर्भ महिला आघाडीच्या संयोजिका सरिता निंबार्ते म्हणाल्या, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा लहान राज्यांचे पुरस्कर्ते होते, लहान राज्यांची निर्मिती म्हणजे प्रगतीकडे वाटचाल होय. विदर्भ निर्मितीच्या लढ्यात महिलांनी आणि तरुणींनी मोठ्या संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यावेळी विदर्भवाद्यांची भाषणे झाली. सहनशीलतेचा अंत पाहू नये आजपासून "रक्ताक्षरीने" अंताचा लढा" विदर्भवाद्यांनी यावेळी गर्भित इशारा दिला. यावेळी पूर्व विदर्भ महिला आघाडीच्या संयोजिका सरिता निंबार्ते, रमाकांत पशीने, केशव हूड, प्रवीण भेलावे, शैलेंद्र निंबार्ते, अजय मेश्राम, प्रा.वडेटावार, मनीषा टेंर्भूणे, सोनाली भेलावे, बबिता तिडके, संगीता बनसोड, वर्षा माटूरकर, प्रगती ढवळे, अमित टीचकुले, वृंदा गायधने, निहार बुलबुले, , बिट्टू सोनकुसरे, चारुदत्त बाळबांडे, प्रवीण कळंबे, अंकित बांते, पी. झेड. गोसावी, अ‍ॅड काटेखाये, पंडित भालाधरे, ललितसिंह बाच्छिल, संजय बनसोड, भास्कर बांगडकर व विदर्भवादी उपस्थित होते. (प्रतिनिधी)साकोलीत रक्ताक्षरी अभियानाला प्रारंभसाकोली : विदर्भ राज्य आघाडी तर्फे आयोजित १ मे काळा दिवस व रक्ताक्षरी अभियानप्रगती कॉलोनीतील चौकात पार पडला. विदर्भाचा ध्वज राकेश भास्कर यांच्या हस्ते फडकावून व त्यांच्या रक्ताची स्वाक्षरी घेवून सदर कार्यक्रमाला सुरुवात झाली. विदर्भाची मागणी ही सामान्य जनतेची आहे हे प्रधानमंत्री यांना सांगता यावे, म्हणून वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे, रक्ताने अंगठा मारून सही केलेले (रक्ताक्षरी) निवेदन संपूर्ण विदर्भार्तन प्रधानमंत्री यांना पाठविण्याचे आंदोलन विदर्भ राज्य आघाडी (वीरा) तर्फे करण्यात येत आहे. रक्ताक्षरी अभियानात वीराचे प्रदेश सचिव राकेश भास्कर, साकोली नगर परिषदचे नगरसेवक मनीष कापगते, समाज भूषण पुरस्कार प्राप्त डी.जी.रंगारी, समाज प्रवर्तक शब्बीर पठाण, साकोली वीराचे दीपक जांभूळकर, सुनील जांभूळकर, अखिलेश गुप्ता, दिलीप मासुरकर, शरद उरकुडे, चेतन खोब्रागडे, हिवराज टेंभूर्णे, विजय रंगारी, महेश शहारे, लक्ष्मण टेंर्भूणे, अशोक बेहरे, लक्ष्मन राऊत, सुनील वाढई, घनश्याम दोनोडे, युवराज वाढई, हिरालाल किरनापुरे, दिनेश कापगते, सिराज भाई, शिवनाथ राऊत, वसंत शिवणकर, हेमकृष्ण कापगते, देविदास चुटे, इमरान पठान, सोनू भुरे, राज गणवीर, अभिलाष गजभिये, जी.एस.आवरकर, एस.आर.आगाशे, अजय जवंजाळ, आकाश सोफंडे, तोसीफ शेख, प्रमोद टेंर्भूणे, सतीश देशमुख, लखन चांदेवार, साहिल गायधने, निखील गिऱ्हेपुंजे, रामाधीश कांबळे, विलास शेंडे, व्ही.पी.शिवरकर अमीन शेख व इतर असे एकूण १२८ विदर्भ वाद्यांनी स्वत:च्या रक्ताने अंगुठा लावून वेगळ्या विदभार्ची मागणी केली. संचालन दीपक जांभूळकर यांनी केले. सकाळी ९ वाजता फडकवीलेला विदर्भाचा झेंडा सायंकाळी ५ वाजता उतरविण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)