शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेच्या मानधनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 00:06 IST

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य कार्यक्रमांतर्गत राबविल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेच्या मानधनात राज्य शासनाने वाढ केली आहे. याबाबतचा आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला आहे. आता दरमहा २०० रुपयांऐवजी ५०० रुपये मिळणार आहेत.

ठळक मुद्देदिलासा : २०० रुपयांवरुन मानधन ५०० रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य कार्यक्रमांतर्गत राबविल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेच्या मानधनात राज्य शासनाने वाढ केली आहे. याबाबतचा आदेश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने निर्गमित केला आहे. आता दरमहा २०० रुपयांऐवजी ५०० रुपये मिळणार आहेत.वृध्दांना आयुष्याच्या सायंकाळी सन्मानाने जगता यावे. यासाठी शासन त्यांना निवृत्तीवेतन देते. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना राज्यात राबविली जात आहे.यात आतापर्यंत या योजनेअंतर्गत अगदी तुटपूंजे मानधन दिले जाते. वेळोवेळी केंद्र शासनाने या योजनांमध्ये सुधारणाही केल्या आहेत. त्यांची अमंलबजावणी राज्य शासनाने केली आहे. वयाच्या ८० वर्षावरील वृध्दांना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजनेंतर्गत आतापर्यंत २०० रुपये मासिक मानधन दिले जात होते. त्यात ३०० रुपयांची वाढ करुन आता सदर मानधन प्रतीमाह ५०० रुपये करण्यात आली आहे.इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेंतर्गत ४० ते ६५ वर्षाखालील महिलांना दरमहा २०० रुपये दिले जात होते. आता या योजनेसाठी ४० ते ७९ वर्ष असे वय करण्यात आले असून प्रतीमाह ३०० रुपये मानधन दिले जाणार असल्याची माहिती आहे. तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंगनिवृत्ती वेतन योजनेसाठी सध्या १८ ते ६५ वर्षाखालील लाभार्थ्यांना लाभ दिला जात होता. त्यात बदल करुन १८ ते ७९ असे करुन २०० रुपयांऐवजी आता प्रतीमाह ३०० रुपये मानधन दिले जाणार आहे.सदर योजनेचे मानधन महागाईच्या काळात अगदी तुटपूंजे असले तरी आयुष्याच्या सायंकाळी ही रक्कमही मोठी असते. आजारपण व विविध कारणात ही रक्कम वृध्दांना आधार ठरते. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयाचा लाभ राज्यातील हजारो वृध्दांना मिळणार आहे.