शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गारांसह अवकाळी पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 21:40 IST

आठ दिवसांपुर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. शुक्रवारीही वेधशाळेने वर्तविलेला अंदाज खरा ठरवत जिल्ह्यात सर्वत्र गारांसह पावसाने हजेरी लावली. बोरीच्या व चना एवढ्या आकाराच्या गारा बरसल्या. या गारपिटीने रबी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चौरास भागात गारपिटीचे प्रमाण जास्त आहे.

ठळक मुद्देरबी पिकांचे नुकसान : शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आठ दिवसांपुर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. शुक्रवारीही वेधशाळेने वर्तविलेला अंदाज खरा ठरवत जिल्ह्यात सर्वत्र गारांसह पावसाने हजेरी लावली. बोरीच्या व चना एवढ्या आकाराच्या गारा बरसल्या. या गारपिटीने रबी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. चौरास भागात गारपिटीचे प्रमाण जास्त आहे.जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिना सुरू होताच अस्मानी संकटाने पुन्हा डोके वर काढले. पहिल्या पावसात बळीराजाने हिम्मत दाखवित पीक नुकसान सहन केले. मात्र मागील आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसाने हातात आलेले पीक ही जाण्याच्या मार्गावर आले. त्यातच धान खरेदी केंद्रातबाहेर उघड्यावर ठेवलेल्या धानाची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. याशिवाय गहू, हरभरा, लाख, लाखोरी यासह कठाण पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. भाजीपाला पिकांवर गारपिटीचा चांगलाच दुष्परिणाम दिसून आला.जवाहरनगर येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास वादळी वाºयासह गारपिट व पाऊस बरसला. यात शेतमालाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. भंडारा तालुक्यात सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. जवळपास १० मिनिटांपर्यंत गारपिटीसह पाऊस बरसला. बोरीच्या आकाराच्या गारा बरसल्या.लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, बोरीच्या आकाराच्या गारांसह पाऊस बरसला. या पावसामुळे कठाण पिकांसह भाजीपाल्यांचे नुकसान झाले. अचानक आलेल्या अवकाळी पावसाने नागरिकांची धांदल उडाली.करडी येथील वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी २ वाजताच्या सुमारास गारपिटीसह पाऊस बरसला. मोहाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतल्या जाते. सदर पावसामुळे पिकांना फटका बसल्याचे सांगण्यात आले. जिल्हा प्रशासनाने या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा तात्काळ मोका पंचनामा करून शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. जिल्ह्यातील लाखनी, साकोली, पवनी, लाखांदूर, तुमसर व मोहाडी तालुक्यातही पाऊस बरसल्याची माहिती आहे.वीज कोसळून बैल ठारसाकोली तालुक्यातही विजांच्या गडगटासह पाऊस बरसला. यात पळसगाव सोनका येथील शेतशिवारात बांधलेल्या बैल जोडीतील एका बैलावर वीज कोसळली. यात बैलाचा जागीच मृत्यू झाला. यामुळे पशुमालक तुकाराम नारायण कावळे यांचे ५० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. कावळे यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.