शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
2
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
3
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
4
या देशाने आधीच भारतासोबत पंगा घेतला होता, आता पाकिस्तानचा उल्लेख करून ट्रम्प यांची स्तुती केली
5
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
6
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
7
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
8
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
9
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
10
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
11
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
12
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
13
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
14
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
15
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
16
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
17
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
18
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
19
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
20
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा

शाळकरी मुलांचा नेटवर्क मार्केटिंगकडे वाढता कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 21:33 IST

विद्यार्थ्यांच्या बारावीच्या परीक्षा संपल्यात आणि दहावीच्यासुद्धा परीक्षा संपत आल्यात. या विद्यार्थ्यांना आता दहावी बारावी नंतर काय? हा सर्वात मोठा प्रश्न भेडसावत आहे. काही विद्यार्थ्यांनी या ऊन्हाळी सुट्ट्यांमध्ये काय करावे हे आधिच ठरवलेले आहे तर काहींना अजुनपर्यंत दिशाच मिळाली नाही. ही दिशा भरकटलेली मुले दुसऱ्यांनी सांगितलेल्या मार्गावर डोळे बंद करून चाललेली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : विद्यार्थ्यांच्या बारावीच्या परीक्षा संपल्यात आणि दहावीच्यासुद्धा परीक्षा संपत आल्यात. या विद्यार्थ्यांना आता दहावी बारावी नंतर काय? हा सर्वात मोठा प्रश्न भेडसावत आहे. काही विद्यार्थ्यांनी या ऊन्हाळी सुट्ट्यांमध्ये काय करावे हे आधिच ठरवलेले आहे तर काहींना अजुनपर्यंत दिशाच मिळाली नाही. ही दिशा भरकटलेली मुले दुसऱ्यांनी सांगितलेल्या मार्गावर डोळे बंद करून चाललेली आहेत.यातील काही विद्यार्थी संगणक, चित्रकला, नृत्य, विविध खेळ यांचे ज्ञान घेणार आहेत तर काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत ऊतरून आपले भविष्य घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र बरेच विद्यार्थी नेटवर्क माकेटींगच्या जाळ्यात अडकले जात आहेत.नेटवर्क माकेर्टींग कंपण्या लवकरात लवकर श्रीमंत होण्याच्या योजना विद्यार्थ्यांना सांगतात. मी कसा घडलो, याची बनवाबनवी उदाहरणे त्यांसमोर मांडतात. आकर्षक जाहीराती तसेच प्रलोभणे देऊन विद्यार्थ्यांना आकर्षीत केले जाते. त्यांची प्रलोभने पाहून विद्यार्थी क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या जाळ्यात अडकली जातात. त्यानंतर त्यांकडुन अ‍ॅडमिशन फीच्या नावाखाली मोठी रक्कम वसूल केली जाते.सध्या तालुक्यातील काही विद्यार्थी त्या फीच्या जुडवाजुडवीसाठी स्वत:च्या घरातील दाग-दागीने ठेवून झटपट पैसे कमविण्याच्या नादात घाई करत आहेत. मात्र अशा योजना फसव्या असतात. ज्या कुठलाही परतावा देत नाहीत. तरी पालकांनी आपल्या पाल्यास योग्य ती दिशा देऊन, अशा प्रलोभणांना बळी पडू देऊ नये. तसेच मुलांनी सद्धा प्रलोभणांना बळी न पडता योग्य तो निर्णय घ्यावा.