शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

मामा तलावाच्या खोलीकरणामुळे सिंचन क्षमतेत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 23:01 IST

गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून मामा तलावाचे खोलीकरण करण्यात येत आहे. खोलीकरणामुळे तलावातील गाळ शेतात टाकून शेतीची सूपिकता वाढविता येइल व तलाव खोलीकरणामुळे पाण्याची पातळी वाढून सिंचनात वाढ होईल.

ठळक मुद्देराजेश काशिवार : गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार मोहिमेचा लवारी येथे शुभारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून मामा तलावाचे खोलीकरण करण्यात येत आहे. खोलीकरणामुळे तलावातील गाळ शेतात टाकून शेतीची सूपिकता वाढविता येइल व तलाव खोलीकरणामुळे पाण्याची पातळी वाढून सिंचनात वाढ होईल. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होईल, यासाठी गावकऱ्यांनी लोकसहभागातून मामा तलावातील गाळ काढण्याचे काम मोठया प्रमाणात करावे, असे आवाहन आमदार राजेश काशिवार यांनी केले.जिल्ह्यात गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार अभियान अनुलोमच्या माध्यमातून लोकसहभागातून करण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ आमदार राजेश काशिवार यांच्या हस्ते साकोली तालुक्यातील लवारी येथील मामा तलावातील गाळ काढून करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते होते. प्रमुख पाहूणे म्हणून साकोलीचे तहसिलदार अरविंद हिंगे, गटविकास अधिकारी एस.एम. तडस, साकोलीच्या नगराध्यक्षा धनवंता राऊत, जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते, पं.स. संदस्य जयश्री पर्वते, अनुलोकचे नागपूर विभागाचे समन्वयक हेमंत ब्राम्हणकर, भंडारा-गोंदियाचे समन्वयक सतीश ठाकरे, लवारीचे सरपंच गायश्री टेंभूर्णे, उपसरपंच सुरेश नागरिकर, उमरीचे सरपंच भोजराज कापगते, सरपंच मुडींपार हरीश लांडगे, सरपंच वडद शोभा शहारे, सरपंच बोदडा सारिका राऊत, सरपंच पिंडकेपार समरित, लवारी ग्रामविकास अधिकारी आर. एम. झाडे, महेश भदाडे उपस्थित होते.आमदार काशिवार म्हणाले, मामा तलावाचे खोलीकरण व दुरुस्तीच्या उपाययोजनाबाबत आपण विधानभवनात आवाज उठविला आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील ४ हजार ३०४ मालगूजारी तलाव १८४० पासून आहेत. आज त्यांना २५० वर्ष झालेले आहेत. तलाव दुरुस्तीच्या स्थितीत आले आहेत. त्यामुळे गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून त्यांचे खोलीकरण करण्यात येत आहे. तलाव खोलीकरणामुळे मासेमारी व्यवसायास चालना मिळेल. तलाव म्हणजे पाणी आणि पाणी म्हणजे जीवन म्हणून या कार्यास गावकऱ्यांनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले. सरपंच व त्यांच्या टिमने समन्वयातून काम करावे तसेच गावाचा विकास साधावा. विपरित परिस्थितीत कार्य करणे हाच पुरुषार्थ आहे.यावेळी बोलतांना रवी गिते यांनी गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार योजनेमुळे पाण्याच्या पातळीत वाढ होईल. तसेच जमीनीची सुपिकता वाढेल असे सांगितले. अनुलोमचा जिल्ह्यातील ८० तलावातून गाळ काढण्याचा निश्चय हा अभिनंदनीय आहे. या कामास गावकऱ्यांनी सहकार्य करावे, असे ते म्हणाले. पाण्याच्या येवा वाढण्यास होणारे मार्ग चालू करण्याची सूचना यावेळी केल्या. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होईल. स्वच्छ गाव होण्यास गावकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.हेमंत ब्राम्हणकर यांनी ५ हजार तलाव अनुलोमद्वारे लोकसहभागातून खोलीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. यात भंडारा, नागपूर, गडचिरोली व गोंदियाचा समावेश आहे. गाळ काढून शेतात टाकणार असल्याने पाण्याची पातळी वाढेल व जमीनीची सुपिकता वाढेल असे ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांची ही महत्वाकांक्षी योजना असल्यामुळे या कामास सहकार्य करावे, असे ते म्हणाले.अशोक कापगते म्हणाले, या तलावाच्या खोलीकरणासाठी अनेकदा निधी मंजूर करण्यात आला. परंतु खोलीकरण झाले नाही. आज गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत हे काम होत आहे. हे लवारीच्या ग्रामस्थांना अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.अनुगामी लोकराज्य महाभियान (अनुलोम) संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे ५ हजार तलाव प्रचंड लोकसहभागातून करत आहे.अनुलोम नी स्वत: सर्व्हे करून ५ हजार तलावांची निवड करून मागील महिन्याभरा पासून तलावातून गाळ काढून तो शेतकऱ्यांच्या शेतात लोकसहभागातून टाकण्याचे कार्य करत आहे.शुभारंभ कार्यक्रमासाठी अनुलोम साकोली भाग जनसेवक महेश भदाडे, हिरालाल बारापात्रे, सुधीर किरणापुरे, महेश करंजीकर, आनंद कापगते, हिरालाल लांजेवार, ग्रामपंचायत कार्यकारिणी व शेतकरी , संपूर्ण ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेऊन गावासाठी पुढाकार घेतला.