शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वायू प्रदुषणामुळे डोळे, श्वसनाच्या आजारात वाढ

By admin | Updated: December 23, 2016 00:36 IST

देव्हाडा बुज स्थित मानस अ‍ॅग्रो साखर कारखान्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत.

मानस अ‍ॅग्रो कारखाना : चौकशीची मागणी करडी (पालोरा) : देव्हाडा बुज स्थित मानस अ‍ॅग्रो साखर कारखान्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त आहेत. कारखान्याचे धुराळ्यामुळे हवेतील प्रदुषण वाढले आहे. हवेतील कणांमुळे डोळे व श्वसनाचे आजार वाढीस लागले आहेत. कारखाना प्रशासनाला याबाबत माहिती असूनही प्रदूषण रोखण्याचे सौजन्य दाखविले जात नाही. सदर कारखाना सत्ताधारी नेत्यांचा असल्याने प्रदुषण मंडळ डोळेझाक करीत असल्याचा आरोप करित प्रकरणी त्वरित चौकशी करुन कारवाईची मागणी होत आहे. देव्हाडा/ नरसिंगटोला स्थित वैनगंगा शुगर अ‍ॅण्ड पॉवर लिमिटेड कारखान्याचे नामांतर नुकतेच मानस अ‍ॅग्रो युनिट क्रमांक ४ या नावाने करण्यात आले आहे. सदर कारखाना पुर्ती उद्योग समुहाच्या मालकीच्या खाजगी कारखाना आहे. सुरुवातीपासून येथील कारखान्याच्या नावावर राजकारण्यांनी आपली पोळी शेकली आहे. रोजगार, बेरोजगारांना काम, ऊसाला सर्वाधिक भाव, १५ दिवसात ऊसाचे व कामगारांचे वेतन, विज निर्माण उद्योग, वर्षभरात लखपती शेतकरी तसेच परिसराची प्रगती, उन्नती, भरभराटी करण्याचे अच्छे दिन आणण्याचे आश्वासन कारखान्याच्या पहिल्याच गाळप हंगामात जिल्हयातील लोकांना साक्षी ठेवून दिले होते. आज त्यांचे पक्षाचे सरकार केंद्रात व राज्यात आहेत. मात्र, आज त्यांच्या आश्वासनाचे गड ढासळतांना दिसत आहेत. विज प्रकल्प अजुनही उभे राहिले नाही. शेतकऱ्यांना लखपती करण्याचे सोडा चांगले भाव मिळत नाही. चार-सहा महिने उसाचे चुकारे मिळत नाही. मुठभर बेरोजगारांना रोजगार यातून मिळाला असला तरी कुशल कामगारांनाही अत्यल्प वेतन दिले जाते. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची घोषणा केली असतांना येथील कामगारांना पहिल्या आयोगाचाही वेतन मिळत नाही. परिसरातील शेतकऱ्यांनी, नागरिकांनी सत्ताधारी पक्षावर भरभरुन प्रेम केले असतांना त्यांना अच्छे दिन अजुनही आलेले नाही असा आरोप आहे. मानस अ‍ॅग्रो कारखान्यामुळे हवेचे प्रदुषण वाढले आहे. रात्रंदिवस धुर ओकणाऱ्या धुराळ्यातुन ऊसाचे बारिक कण मोठ्या प्रमाणात हवेत तरंगत आहेत. काळे कण देव्हाडा ते करडी राज्य मार्ग २७२ वरुन जाणाऱ्या वाहन चालकांचे डोळ्यात जखम करण्यास कारणीभूत ठरत आहेत. परिसरातील देव्हाडा, नरसिंगटोला, निलज बुज. आदी गावात या कणांमुळे श्वसनाचे आजार वाढीस लागले आहेत. कारखाना प्रशासन व प्रदुषण नियंत्रकांकडून डोळेझाक केली जात आहे. कारखाना मोठ्या राजकारण्यांच्या प्रभावातील असल्याने बोर्ड कारवाईचे धाडस केले जात नाही. डोळ्याचे आजार व हृदयाचे आजार वाढीस लागल्याने प्रदुषण नियंत्रण मंडळाने दबावात न येता त्वरित चौकशी करुन कारवाईची मागणी पं.स. सदस्य महादेव पचघरे, निलजचे ग्रा.पं. सदस्य गणेश गाढवे, ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)