शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

भविष्याचा वेध घेऊन पक्ष वाढवा

By admin | Updated: January 4, 2017 00:45 IST

नुकत्याच झालेल्या विधानपरिषद व नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पिछेहाट झाली.

प्रफुल्ल पटेल : नगरपरिषदेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा भंडारा : नुकत्याच झालेल्या विधानपरिषद व नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पिछेहाट झाली. जुन्या वर्षाच्या कॅलेंडरनंतर नवीन वर्षाचे कॅलेंडर सुरु होते. त्याचप्रमाणे पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भविष्याचा वेध घेऊन पक्ष संघटन वाढीसाठी भर द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. भंडारा येथे नगर परिषदच्या आजी - माजी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यासाठी भंडारा आले असता ते कार्यकर्त्याशी बोलत होते. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित छोटेखानी कार्यक्रमासाठी खा.प्रफुल्ल पटेल आले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेश डोंगरे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, नगराध्यक्ष बाबूराव बागडे, प्रदेश सचिव धनंजय दलाल, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी खासदार पटेल यांनी नगरपालिकेच्या आजी व माजी नगरसेवक तथा पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. त्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी हेवेदावे विसरून पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी प्रयत्न करावे तसेच पवनी क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्यांकरिता राष्ट्रवादी काँग्रेस नेहमी खंबीर पाठीशी उभे राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. निवडणुकीत सर्वांनी आपापली जबाबदारी सांभाळली. मात्र पक्षाने केलेले कार्य पोहचविण्यात कमीपणा राहिल्याने निवडणुकीत पक्ष माघारला अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी नितीन तुमाने, लोमेश वैद्य, डॉ.विजय ठक्कर, मोहन सूरकर, मुकेश बावनकर, यादव भोगे, शोभना गौरशेट्टीवार, महेंद्र गडकरी, चौसरे, शहजाद बेग शालू, अभिषेक कारेमोरे, कैलाश नशिने, भगवान बावनकर, डॉ.विनयमोहन पशिने आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)