लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : दरवर्षी दूध उत्पादनात सातत्याने वाढ होत असली तरीही दुधाची प्रती व्यक्ती उपलब्धता लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात कमीच आहे. यासाठी दूध देणाऱ्या जनावरांची दूध उत्पादन क्षमता वाढविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भंडारा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. सतीश राजू यांनी केले.जिल्हा पशुसंवर्धन विभाग व राष्ट्रीय डेअरी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने भंडारा तालुक्यातील आमगाव (दिघोरी) येथे दुधाळ जनावरांचे आहार संतुलन व चारा व्यवस्थापन विषयावर आयोजित कार्यशाळाप्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी एनडीडीबीचे उपव्यवस्थापक डॉ. चंद्रशेखर डाखोळे, जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, कार्यकारी संचालक करण रामटेके, पशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. सविता वाढई आदी उपस्थित होते.डॉ. सतिश राजू यांनी शेतकºयांना बहुवार्षिक चारा पिकांची निवड लागवड व उत्पन्न या विषयावर माहिती दिली. यासंबंधी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. चंद्रशेखर डाखोळे यांनी संतुलीत पशुआहार व दूध उत्पादन खर्च कमी करण्याविषयी मार्गदर्शन केले.रामलाल चौधरी यांनी दूध उत्पादक शेतकºयांनी चारा लागवड करून दूध उत्पादनाकरिता होणाºया आहारावरील खर्च कमी करण्यासाठी प्रोत्साहित केले. या कार्यशाळेत ४० दूध उत्पादक शेतकºयांनी सहभाग घेतला. संचालन व आभार पशुधन पर्यवेक्षक विशाल भडके यांनी केले.कार्यशाळेतून मिळणार शेतकºयांना मार्गदर्शनआहारामध्ये प्रथिने, ऊर्जा आदींच्या कमतरतेमुळे थेट दूध उत्पादनावर परिणाम होऊन दूध उत्पादन घटते. जनावर आपल्या क्षमतेनुसार दूध उत्पादन करू शकत नाही. जनावरांना आहार संतुलन व चारा व्यवस्थापन दूध उत्पादनाच्या प्रमाणात दिल्यास अपेक्षित दूध उत्पादन मिळू शकते. कार्यशाळेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकºयांमध्ये चारा लागवड व दूध उत्पादन खर्च कमी करणे या विषयावर आता जिल्ह्यातील अनेक ठिकाणी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळांचा दूध उत्पादक शेतकºयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. सतीश राजू यांनी केले आहे.
दूध उत्पादन वाढविणे काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 23:14 IST
दरवर्षी दूध उत्पादनात सातत्याने वाढ होत असली तरीही दुधाची प्रती व्यक्ती उपलब्धता लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात कमीच आहे. यासाठी दूध देणाऱ्या जनावरांची दूध उत्पादन क्षमता वाढविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भंडारा जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. सतीश राजू यांनी केले.
दूध उत्पादन वाढविणे काळाची गरज
ठळक मुद्देसतीश राजू : आमगाव येथे दुधाळ जनावरांचे आहार संतुलन व चारा व्यवस्थापन कार्यशाळा