शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पदाधिकाऱ्यांचे मानधन वाढवा

By admin | Updated: August 30, 2014 01:42 IST

भारत हा कृषीप्रधान देश असून गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर हा ग्रामीण भागात राहातो. या जनतेची सेवा करणे हा तेथील लोकप्रतिनिधींचे काम असून ग्रामीण ....

भंडारा : भारत हा कृषीप्रधान देश असून गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर हा ग्रामीण भागात राहातो. या जनतेची सेवा करणे हा तेथील लोकप्रतिनिधींचे काम असून ग्रामीण जनतेचा विकास सरपंच, पंचायत समिती सदस्य, ग्राम पंचायत सदस्यांवर असून या लोकप्रतिनिधींना अत्यल्प मानधनावर काम करावे लागत असून त्यांच्यात नैराश्य पसरले आहे. शासनाने आमदार खासदारांच्या वेतनात अलीकडचे मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधींच्या मानधनात कोणतीही वाढ न झाल्यामुळे सदर सदस्यांना समाजातील कार्य करताना अडचण येत आहे. त्यामुळे सदर सदस्यांच्या मानधनात वाढ करून त्यांना सन्मान द्यावा अशी मागणी आहे.सध्याच्या परिस्थितीत ग्रा.पं. सदस्यांना ५०० रु. मानधन मिळत असून ग्राम पंचायतीचे सरपंच, सदस्य उपाशी तर लोकप्रतिनिधी तुपाशी अशी परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा गावपरिसरात ऐकावयास मिळते. पाच आकड्यांचा पगार, निधी, सोयी सवलती तर सरपंच, पंचायत समिती सदस्य, ग्राम पंचायत सदस्यांना योग्य मानधन न मिळाल्याने शासनाप्रती नाराजी आहे. ७३ व्या घटनादुरुस्तीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठ्या प्रमाणात अधिकार बहाल करण्यात आले आहेत. गावविकासाची जबाबदारी तेथील सदस्यांवर असते. ग्राम पंचायत सदस्यांना कोणताही प्रवास व इतर भत्ता मिळत नाही. गावाची जबाबदारी बजावणाऱ्या सदस्यांवर शासन आणखी कामे लादत आहे. मात्र गावविकासावर ज्यांची धुरा आहे त्यांच्या मानधनाकडे शासन लक्ष देत नाही. पोलीस पाटील यांना ३००० रु. मानधन मिळत आहे. जिल्हा परिषद सभापती, पं.स. सभापती, उपसभापती यांना आठ ते दहा हजार मानधन दिल्या जातो. लोकप्रतिनिधी हे लोकसेवक असून लोकसेवकांवर जबाबदारीप्रमाणे मानधन देण्याची गरज आहे.वाढत्या महागाईच्या काळात अत्यल्प मानधनावर खर्चही भागत नाही. सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य यांना आपल्या गावातून जिल्हा परिषद , तालुका व जिल्हा मुख्यालयी बैठकीला उपस्थित राहावे लागते. त्यामुळे त्यांना दैनंदिन दिवसाचा खर्चही येत असतो. अत्यल्प मानधनामुळे सदर लोकप्रतिनिधींची कुचंबना होत आहे. गाव विकासाची धुरा सांभाळणाऱ्या सरपंच, सदस्य, पंचायत समिती सदस्यांच्या मानधनात वाढ करावी अशी मागणी ग्रामीण स्तरातून होत आहे. (प्रतिनिधी)