शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

धान्य वितरण व्यवस्था मजबूत करावी

By admin | Updated: April 5, 2016 03:22 IST

गावातील धान्य वितरण व्यवस्था मजबूत करण्यासाठी ग्रामदक्षता समित्या सक्षम करणे गरजेचे आहे. त्यासाठी गाव दक्षता

भंडारा : गावातील धान्य वितरण व्यवस्था मजबूत करण्यासाठी ग्रामदक्षता समित्या सक्षम करणे गरजेचे आहे. त्यासाठी गाव दक्षता समित्यांच्या नियमित बैठका घेवून त्याची इतिवृत्त प्रत्येक महिन्याच्या मागणीपत्रासोबत जोडावे. तसेच रेशन दुकानदारांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेला धान्यसाठा ग्रामपंचायत तसेच रेशन दुकानामध्ये जाहिररित्या प्रदर्शित करावा, असा सूर आजच्या पहिल्याच जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत अशासकीय सदस्य व शासकीय सदस्यांनी व्यक्त केला.जिल्हा दक्षता समितीवर पालकमंत्र्यांनी निवडलेल्या अशासकीय सदस्यांचा समावेश असलेल्या समितीची पहिली बैठक आज जिल्हाधिकारी तथा उपाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याबैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे , अ‍ॅड. वसंत एंचीलवार, विठ्ठल बांडेबुचे, राजु गायधने, मिलींद रामटेके, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बनसोड, उपनिबंधक एस.एन. क्षीरसागर, माहिती अधिकारी मनीषा सावळे उपस्थित होते. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी जिल्ह्यातील धान्य वितरण व्यवस्थेसंबंधी माहिती सदस्यांना दिली. यापूर्वी जिल्ह्यात गोडावून मधून रेशन दुकानदार धान्य घेवून जात होते. आता एकाच पुरवठादारामार्फत सर्व रेशन दुकानदारांना धान्याचा पुरवठा करण्यात येतो. जिल्ह्यात ५ लाख ४३ हजार ४०६ प्राधान्य कुटुंब तर ६४ हजार २४९ अंत्योदय कुटुंब आहेत. तसेच जिल्ह्यात एकूण ८८८ रेशन दुकानदार असून ११७८ किरकोळ केरोसिन विक्रेते आहेत. जिल्ह्यात आधार सिडींगचे काम ८२.२९ टक्के झाले आहे, अशी माहिती अनिल बनसोड यांनी समिती समोर ठेवली. ग्राहकांना वेळेवर धान्य मिळण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या २५ ते ३० तारखेपर्यंत तहसिलदारांकडे मागणीपत्र भरुन दिले पाहिजे. यासह अनेक सूचना अशासकीय सदस्यांकडून करण्यात आली. (नगर प्रतिनिधी)