शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बपेरा आंतरराज्यीय सीमेवरील राहुटीत असुविधा

By admin | Updated: December 22, 2016 00:48 IST

बपेरा आंतर राज्यीय सिमेवर पोलीस चौकी मंजुर करण्यात आली असली तरी येथे सुविधांचा अभाव आहे.

वीज, पाणी, शौचालयाची समस्या : चोरीच्या विजेचा वापर, कडाक्याच्या थंडीत पोलिसांची सेवा चुल्हाड (सिहोरा) : बपेरा आंतर राज्यीय सिमेवर पोलीस चौकी मंजुर करण्यात आली असली तरी येथे सुविधांचा अभाव आहे. राहुटीतून सेवा बजाविताना कडाक्याचे थंडीत पोलिसांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बपेरा आंतरराज्यीय सिमा कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्तात ठेवण्यासाठी चौकी मंजुर करण्यात आली असून राहुटी उभारण्यात आली आहे. या राहुटीत तीन पोलीस शिपाई आणि एक पोलीस हवालदार व एक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. या राहुटीमध्ये सुविधांचा अभाव आहे. पोलिसांना रात्री आराम करण्यासाठी पलंग आहे, परंतु झोपायला गादी नाही. कागद आणि खड्ड्यांचा आधार घेवून आराम करण्याची पाळी आली आहे. केंद्र आणि राज्य शासन शौचालय बांधकामार अधिक भर देत आहे. उघड्यावर शौचास बसण्यापासून नागरिकांना परावृत्त करण्यात येत आहे. परंतु या पोलीस चौकीत शौचालयाची सुविधा नाहीत. परिणामी पोलिसांना उघड्यावर शौचास जावे लागत आहे. सध्या परिसरात वाघांची गावागावात दहशत आहे. अनेक गावकऱ्यांना वाघ गावांच्या दिशेने आढळला आहे. परंतु सिमेवरील पोलिसांना संरक्षण करण्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या नाही. २४ तास वाहनाची तपासणी सिमेवर करण्यात येत आहे. वीज वितरण कंपनी मार्फत विजेची सोय करून देण्यात आली नाही. परिणामी महावितरणची वीज चोरी करून प्रकाश करण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. चोर पकडण्यासाठी धडपडणाऱ्या पोलिसांवर वीज चोरी करावी लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे. कायमस्वरूपी पोलीस चौकी मंजुरी मिळाली असताना इमारत बांधकाम हालचालींना जिल्हा पोलीस प्रशासनाने वेग दिला नाही. सिमेवर जागेचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. महसूल विभागाने बपेरा व देवसर्रा गावाच्या हद्दीत असणारी जागा पोलीस विभागाला दिली आहे. यामुळे जागेबाबत हिरवा कंदील प्राप्त झाला असताना बांधकामाचा मुहूर्त अद्याप काढण्यात आला नाही. या आधी नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न अशी अवस्था झाली होती. पोलीस चौकीच्या इमारत बांधकामासाठी १५ लाख रूपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान इमारत बांधकामाचा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रशासनाला पाठविण्यात आला आहे. परंतु या प्रस्तावावर अद्याप शिक्कामोर्तब झाला नाही, अशी माहिती मिळाली आहे. (वार्ताहर) वाहनधारकांचा पळवाट शोधण्याचा प्रयत्न सिहोरा पोलीस चौकी तैनात करण्यात आली असता अवैध व्यवसायीकांची पळवार शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेचा मध्यप्रदेश राज्याला जोडणारा धरण मार्ग व बपेरा आठवडी बाजारातून सुकडी मार्ग दाखल घेण्यास ही मार्ग पडवाट करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. यामुळे तपासणी नाक्यावर वाहनाची संख्या रोडावली असल्याचे दिसून येत आहे. धरण व आठवडी बाजार मार्ग बंद करण्याची गरज आहे. सिमेवर सुविधांचा अभाव असला तरी सेवा प्रभावित नाही. वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. धरण व आठवडी बाजार मार्ग बंद केल्यास वाहन धारकांना पळवाट मिळणार नाही. -जयप्रकाश मलेवार, चौकी इन्चार्ज बपेरा.