शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

संशयित रोख व्यवहारावर राहणार आयकर विभागाची नजर

By admin | Updated: October 25, 2016 00:21 IST

भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीत आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून..

विधान परिषद निवडणूक : आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देशभंडारा : भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणुकीत आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार असून संशयित रोख व्यवहार व बँक व्यवहारावर आयकर विभागाची नजर राहणार आहे. निवडणू संबंधीत व्यक्तींनी कुठल्याही माध्यमातून केलेले बँक व्यवहार तसेच परदेशवाऱ्या व सहली यावर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. यात दोषी आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिले.या पत्रपरिषदेत गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप भुजबळ, भंडाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल.अहीरे, गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रदीपकुमार डांगे, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) विजय उरकुडे उपस्थित होते.विधानपरिषद निवडणुकीची भंडारा- गोंदिया जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीत आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दोन्ही जिल्ह्यात भरारी पथक स्थापन करण्यात आले असून तक्रार निवारण कक्ष निर्माण करण्यात येणार आहे. अवैध दारू विक्री व डेली स्टॉक नियंत्रित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. सोशल मिडीयावरील प्रचारावर पोलीस विभागाच्या सायबर सेलकडून नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सोशल मिडीयाचा वापर नागरिकांनी जपून करावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.विधान परिषद निवडणुकीशी संबंधित संशयित बँक व्यवहार व परदेशवाऱ्या यावर आयकर विभागामार्फत नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. मोठे तसेच रोखीचे बँक व्यवहार आयकर विभागाच्या संशयाच्या टप्प्यात असणार आहेत. अशा व्यवहाराची शंका असल्यास पुराव्यानिशी तक्रार करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.या निवडणुकीसाठी लागणाऱ्या परवानगीसाठी ‘एक खिडकी’ योजना सुरू करण्यात येणार आहे. बॅनर, पोस्टर तातडीने काढण्यासंदर्भात नगरपालिका मुख्याधिकारी व खंडविकास अधिकारी यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणुकीच्या आचारसंहितेच्या दरम्यान नवीन कामांच्या निविदा प्रकाशित करणे, प्रशासकीय मान्यता देणे किंवा भूमीपूजन करणे यावर प्रतिबंध असणार आहे.२६ रोजी अधिसूचना प्रसिद्धभंडारा-गोंदिया प्राधिकारी मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली असून २६ आॅक्टोबर रोजी अधिसूचना प्रसिध्द करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २ नोव्हेंबर आहे. ३ नोव्हेंबर रोजी अर्ज छाननी, 5 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. १९ नोव्हेंबर रोजी मतदान होईल तर २२ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे.३९३ मतदारसंख्याया निवडणुकीत एकूण मतदारांची संख्या ३९३ एवढी आहे. यात भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद भंडारा ५९, नगर परिषद भंडारा ३५, नगर परिषद तुमसर २५, नगर परिषद पवनी १९, नगर पंचायत मोहाडी १९, नगर पंचायत लाखनी १९, नगर पंचायत लाखांदूर १९ असे भंडारा जिल्ह्यातील १९५ तर गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद गोंदिया ५९, नगर परिषद गोंदिया ४४, नगर परिषद तिरोडा १९, नगर पंचायत गोरेगाव १९, नगर पंचायत सडकअर्जुनी १९, नगर पंचायत देवरी १९, नगर पंचायत अजुर्नी (मोरगाव) १९ असे १९८ स्थानिक प्राधिकारी संस्थेचे सदस्य मतदार आहेत.चार प्रारूप मतदान केंद्रया निवडणुकीसाठी भंडारा जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी कार्यालय भंडारा, उपविभागीय अधिकारी कार्यालय साकोली, गोंदिया जिल्ह्यात तहसिल कार्यालय सडकअर्जुनी व मनोहर नगर परिषद हायस्कुल गोंदिया ४ प्रारूप मतदान केंद्र राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.भंडाऱ्यात राहणार स्ट्राँगरूमभंडारा-गोंदिया स्थानिक मतदार संघ निवडणुकीसाठी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत संबंधित मतदान केंद्रावर मतदान होईल. मतमोजणी २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजतापासून करण्यात येईल. मतपेट्या ठेवण्यासाठी भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात स्ट्राँगरूम निश्चित करण्यात आली आहे.२१ आॅक्टोबर रोजी प्रारूप मतदान केंद्राची यादी प्रसिध्द करण्यात आली असून प्रारूप मतदान केंद्राच्या यादीवर २८ आॅक्टोबरपर्यंत आक्षेप मागविण्यात आले आहेत. राजकीय पक्षांना प्रचार, वाहन व सभेसाठी परवानगी देण्याकरीता जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा व गोंदिया असे प्रत्येकी एक पथक नेमण्यात आले आहे. यासाठी भंडारा येथे निवासी उपजिल्हाधिकारी यांचेकडून परवानगी देण्यात येणार आहे. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)