संपूर्ण बांबूचा उपयोग करून अतिशय आकर्षक अशा या बांबूच्या झोपड्या तयार करण्यात आल्या आहेत. कोका अभयारण्यात दूरवरुन अनेक पर्यटक येत असतात. पर्यटकांकरीता आकर्षणाचे केंद्र बनलेल्या बांबू हटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अनिल गायधने, युवा सेना विधानसभा प्रमुख आशहष चवडे, उपतालुका प्रमुख राजेश थोटे, जेएफएम कोकाचे अध्यक्ष संजय इळपाते, सरपंच सरिता कोडवते, जिल्हा परिषद माजी सदस्य उत्तम कळपते, जेएफएम कोषाध्यक्ष सिद्धार्थ मेश्राम, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तुकाराम हातझाडे, सहायक वनरक्षक वाय. बी. नागुलवार, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. बी. राजूरकर, उपसरपंच वर्षा शहारे, रामकृष्ण हातझाडे, रवींद्र गजभिये, शुभांगी भांडारकर, काशीनाथ हातझाडे, आकाश मेश्राम, किसन मेश्राम, नरवीर टेकाम, भोजराम हातझाडे, मीना साठवणे, शशीकला राऊत, लक्ष्मी गजभिये, गीता हातझाडे आदी उपस्थित होते.
कोका येथील बांबू हट विश्रामगृहाचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:33 IST