शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

'ट्राय'च्या निर्णयात सुधारणा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 22:17 IST

टेलिकॉम रेग्युलेटरी आॅथरिटी आॅफ इंडिया (ट्राय)ने २९ डिसेंबरपासून लागू होणाऱ्या नवीन निर्णयामुळे केबल ग्राहकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे.

ठळक मुद्देनिवेदन : जिल्हा केबल ओनर वेल्फेअर असोसिएशनची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : टेलिकॉम रेग्युलेटरी आॅथरिटी आॅफ इंडिया (ट्राय)ने २९ डिसेंबरपासून लागू होणाऱ्या नवीन निर्णयामुळे केबल ग्राहकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे ट्रायचा निर्णय रद्द करण्यात यावा किंवा त्यात सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी भंडारा जिल्हा केबल ओनर वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.केबल चालकांचा व्यवसाय शासनाकडून कुठल्याही प्रकारची मदत मिळत नसतानाही सुरळीत सुरू असताना ट्रायचा निर्णय घेण्यात आला.आजपर्यंत प्रती महिना २०० रूपये २५० रूपये मासिक वर्गणी जवळपास ४०० चॅनल ग्राहकांना केबल चालकांकडून देण्यात येत आहे. यात काही चॅनल मोफत तर काही चॅनल रोखीचा समावेश आहे. मात्र ट्रायने लागू केलेल्या नवीन निर्णयामुळे ग्राहकांना महिनाकाठी जवळपास हजार रूपये मोजावे लागतील. त्यामुळे केबल चालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.सध्या स्थितीत ग्राहकांनाकडून २०० ते २५० रूपये तर ग्रामीण भागात १५० रूपयापेक्षा अधिकची रक्कम देण्यास तयार होत नाही. २९ डिसेंबरपासून लागू होणाऱ्या नवीन निर्णयात शहरी व ग्रामीण असा कुठलाही फरक न ठेवता सर्व ग्राहकांना सरसकट दर लागू करण्यात आलेले आहे. केबची मासीक वर्गणी मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने अनेक केबलधारक जोडणी बंद करण्याच्या तयारीत आहे. यामुळे केबल चालकांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.चॅनलचे दर कमीत कमी ५० पैसे व अधिकाधिक पाच रूपये ठेवण्याची गरज आहे. नवीन दराचा निर्णय रद्द करून त्यात सुधारणा करण्यात यावी जेणे करून जुन्या नियमानुसार म्हणजेच डिजिटल अ‍ॅन्ड्रेसेबल केबल टिव्ही सिस्टम (डीएएस) प्रमाणे केबल ग्राहकांची विभागणी चार भागात केली आहे. यात मोठी शहरे, मध्यम शहरे, लहान शहरे, ग्रामीण भाग अशा प्रकारची विभागणी ट्रायच्या नवीन दरवाढीच्या निर्णयात करण्याची गरज असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यां मार्फत प्रधानमंत्री, सूचना व प्रसारन मंत्रालय, खासदार प्रफुल पटेल, खासदार मधुकर कुकडे यांना पाठविण्यात आले आहे.शिष्टमंडळात असोसिएशनचे अध्यक्ष विश्वकांत भुजाडे, शैलेश जांभुळकर, सुनिल वलके, संजय भुरे, राजेश डोकरीमारे, अनिल चौधरी, दामु पडोळे, संजय चौधरी, सुभाष वंजारी, शरद भांडारकर, अमर उजवणे, जाबीर मालाधरी आदींचा समावेश होता.