शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

मिनी मंत्रालयाच्या व्हरांड्यात महत्त्वपूर्ण दस्तावेज असुरक्षित

By admin | Updated: December 27, 2014 01:07 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे महत्वपूर्ण दस्तावेज पायऱ्यांच्या खाली अडगळीत ठिकाणी अस्तव्यस्त ठेवण्यात आले आहे.

देवानंद नंदेश्वर भंडाराजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे महत्वपूर्ण दस्तावेज पायऱ्यांच्या खाली अडगळीत ठिकाणी अस्तव्यस्त ठेवण्यात आले आहे. हे दस्तावेज चोरीला गेले तर महत्वाची माहिती शोधूनही सापडणार नाही. हे दस्तावेज असुरक्षित आहेत. याकडे कुणाचेचे लक्ष जात नाही. याला काय म्हणावे, हा खरा प्रश्न आहे.जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत गोरगरीब रुग्णांसाठी आधारवड असलेले ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र व पंचायत समिती स्तरावरील सात आरोग्य केंद्रांचा कारभार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामधील महत्वपूर्ण दस्तावेज दि.२२ डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेत आणण्यात आले. हे दस्तावेज जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा आवारात ठेवण्यात आले. जिल्हा परिषदेला चार प्रवेशद्वार आहेत. पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण दिशेला हे प्रवेशद्वार आहेत. आरोग्य विभागाचे महत्वपूर्ण दस्तावेज पश्चिम दिशेला असलेल्या प्रवेशद्वारा शेजारी वाहनांमार्फत आणण्यात आले. येथे मजूरांनी दस्तावेज अस्तव्यस्त पध्दतीने ठेवून दिले. दस्तावेजांचे गठ्ठे विखूरलेले असतांना तेथील बहुतांश कागदपत्रे फाटले तर काही चुरडले. पश्चिम द्वारावर प्रथम खोली ही आरोग्य विभागाच्या संगणक कक्षाची आहे. त्यानंतर साथरोग सर्वेक्षण विभाग आहे. यांच्यापुढे जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे कक्षासह आरोग्य विभागासंबधीत कार्यालय तळमजल्यावर आहे. या कक्षांच्या समोर असलेल्या व्हरांड्यात दस्तावेजांचा ढीग लावलेला आहे. पहिल्या माळ्यावर जाण्यासाठी रस्ता देखील खुला नाही. शेजारीच जिल्हा परिषदेला वीज पुरवठा करणारे संयत्र आहे. स्पार्कींग झाल्यास महत्वपूर्ण दस्तावेज जळून खाक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.आज ‘लोकमत’ प्रतिनिधीने जिल्हा परिषदेत फेरफटका मारला असता त्यांना ही परिस्थिती दिसून आली. दस्तावेजांची पाहणी करुन काही कागदपत्रे हातात घेतली मात्र कुणीही हटकले नाही. याच परिसरात काही नागरिक आवागमन करित असतांना त्यांनाही विचारपूस केली असता ‘सध्या गुलाबी थंडी पडत असल्यामुळे शेकोट्या पेटविण्यासाठी दस्तावेजाचा वापर करण्यासाठी आले असावे’ अशी उपहासात्मक भाष्य केले.पश्चिम दिशेच्या प्रवेशद्वारासमोरच लाकडी साहित्य तथा लोखंडी पत्रे ठेवलेले आढळून आले. मुख्य प्रवेशद्वाराकडून न जाता पश्चिम दिशेच्या प्रवेशद्वाराकडून अनेक कर्मचारी तसेच नागरिक आवागमन करतात. त्यांना अडथळा किंवा इजा होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संगणक कक्षात दुपारच्या सत्रात आरोग्य विभागाची बैठक सुरु होती. त्यामुळे व्हरांड्यात असलेल्या दस्तावेजांकडे कुणाचेही लक्ष नव्हते. नागरिक त्या दस्तावेजांची पाहणी करीत होते. मात्र कुणीही दस्तावेजाविषयी ‘ब्र’ काढला नाही. त्यामुळे जिल्हा परिषद दस्तावेजांच्या सुरक्षेसाठी किती गंभीर आहेत, याची कल्पना येते. हे येथे उल्लेखनीय.