शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दोन लाख २१ हजार विद्यार्थ्यांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 22:52 IST

जिल्ह्यात सुरु असलेल्या गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेंतर्गत आतापर्यंत दोन लाख २१ हजार विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. ही लस संपूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत उईके यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

ठळक मुद्देलस पूर्णपणे सुरक्षित : गोवर-रुबेला मोहिमेत ८३ टक्के लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात सुरु असलेल्या गोवर-रुबेला लसीकरण मोहीमेंतर्गत आतापर्यंत दोन लाख २१ हजार विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. ही लस संपूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत उईके यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.२७ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर पर्यंत शहरी व ग्रामीण भागातील १३२४ शाळांमधून २ लाख २१ हजार ३३४ विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. या मोहीमेची टक्केवारी ८३ आहे. उर्वरीत लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून २७ डिसेंबर पर्यंत २ लाख ६५ हजार ८४२ विद्यार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. गोवर-रुबेला लस पूर्णपणे सुरक्षित असून या पूर्वी २२ राज्यांमध्ये १३ कोटी बालकांचे लसीकरण करण्यात आल्याची माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली.भंडारा तालुक्यात ४९ हजार ७५३, मोहाडी २८ हजार ८६७, तुमसर ४० हजार ६९७, लाखनी २६ हजार ३९९, साकोली २५ हजार ६, लाखांदूर १९ हजार ५८७ आणि पवनी तालुक्यात ३१ हजार २५ विद्यार्थ्यांना लस देण्यात आली. जिल्ह्यातील ९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील १४२८ शाळा आणि १४२७ अंगणवाडी केंद्रातील बालकांना लस देण्याची मोहीम जिल्ह्यात सुरु आहे. या मोहीमेदरम्यान काही ठिकाणी बालकांना किरकोळ स्वरुपाचा त्रास झाल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.आराध्याच्या मृत्यूचे कारण अहवालानंतरच कळेललाखनी तालुक्यातील लाखोरी येथील आराध्या रणजित वाघाये (११ महिने) हिचा मृत्यू झाला. गोवर-रुबेला लस दिल्यानेच आपल्या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे. मात्र तिचा नेमका मृत्यू कशाने झाला हे वैद्यकीय तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कळेल. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत उईके यांनी दिली. लसीकरणादरम्यान १७० बालकांना सौम्य स्वरुपाच्या प्रतिक्रिया उद्भवल्या होत्या. त्यांच्यावर वेळीच उपचार करण्यात आले. दहा लाभार्थ्यांना मध्यम प्रतिक्रिया उद्भवल्याने नागपुरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार करण्यात आल्याचे डॉ.उईके यांनी सांगितले.