शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दूषित पाणी पुरवठ्याने बळावले आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 22:10 IST

भंडारा शहरात मागील पाच वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा दूषित पुरवठा होत असताना याचा दूरगंभीर परिणाम जाणवू लागला आहे. दूषित पाण्याने नागरिकांना अनेक आजार उद्भवू लागले असून या गंभीर समस्येकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नवीन वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम अजूनपर्यंत सुरु झालेले नाही.

ठळक मुद्देपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : लिकेज शोधूनही सापडेना, वाढीव पाणीपुरवठा योजेनेचे कामही सुरू होईना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा शहरात मागील पाच वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा दूषित पुरवठा होत असताना याचा दूरगंभीर परिणाम जाणवू लागला आहे. दूषित पाण्याने नागरिकांना अनेक आजार उद्भवू लागले असून या गंभीर समस्येकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. नवीन वाढीव पाणी पुरवठा योजनेचे काम अजूनपर्यंत सुरु झालेले नाही.हाकेच्या अंतरावर बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीपात्रातून पावणेदोन लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहराला पाणी पुरवठा नगरपालिकेच्या माध्यमातून केला जातो.शहरात १० हजारांच्या वर घरगुती नळधारक असून ३०० च्या वर सार्वजनिक नळजोडणी आहेत. दिवसेंगणिक नळधारकांची संख्याही वाढत असताना दूषित पाण्याच्या समस्येवर अजूनपर्यंत कायमस्वरुपी तोडगा निघालेला नाही.‘फॉल्ट’ शोधूनही सापडत नसल्याने पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. दूषित पाणीपुरवठा होत असल्यामुळे भंडारा शहरातील नळाच्या उपयोगीतेवर असलेल्या नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. यात त्वचेचे व पोटाचे विकार बळावले आहेत.शुद्ध पाण्याचा गोरखधंदादूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे अनेकांनी पाच रुपयात २० लिटर शुद्ध पाणी विकत घेण्याकडे कल वाढविला आहे. अनेकांनी नळाचे पाणी पिणे बंद केले आहे. मात्र बाहेरील वापरासाठी नळाचे पाणी वापरले जाते. परिणामी त्वचेचे आजार होत असल्याची बाब समोर येत आहे. दुसरीकडे भंडारा शहरात ठिकठिकाणी पाच रुपयात २० लिटर पाणी देण्याचे केंद्र सुरु झाल्याने व दुसरीकडे पालिका तर्फे दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने शुद्ध पाण्याचा व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. या व्यवसायाला कुणाचीही सक्ती नसली तरी पालिका प्रशासनाची जबाबदारी शुद्ध पाणी पुरवठ्याची असताना याबाबत पालिका प्रशासन धीरगंभीर दिसत नाही.ठिकठिकाणी येते काळेकुट्ट पाणीशहरातील बहुतांश भागात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. यात काही ठिकाणी काळेकुट्ट पाणी तर काही ठिकाणी फेसाळयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. काही वॉर्डात तर रसायनयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याची बाबही समोर आली आहे. याबाबत नागरिकांनी स्वत: पालिका कार्यालयात जाऊन अधिकाºयांसह पदाधिकाऱ्यांना ही बाब कळविली आहे. मात्र यावर अजूनपर्यंत तोडगा निघालेला नाही.