शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मोहगाव येथे अवैध वाळू व्यवसाय जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 21:43 IST

तालुक्यातील मोहगाव देवी टोली ते रोहना रस्त्याजवळ सूर नदीच्या काठावर बाबू वाघमारे यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात वाळू जमा करून रात्र-दिवस अवैध वाळू व्यवसाय जोमात सुरू आहे. या वाळू चोरट्यावर जिल्हा खनिकर्म अधिकारी मोठी कारवाई करतील का, असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे मागील एक वर्षापासून एकाही महसूल अधिकाऱ्यांनी यावर कारवाई केलेली नाही.

ठळक मुद्देदिवस-रात्र उपसा सुरु : जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांपुढे रेती चोरी पकडण्याचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : तालुक्यातील मोहगाव देवी टोली ते रोहना रस्त्याजवळ सूर नदीच्या काठावर बाबू वाघमारे यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात वाळू जमा करून रात्र-दिवस अवैध वाळू व्यवसाय जोमात सुरू आहे. या वाळू चोरट्यावर जिल्हा खनिकर्म अधिकारी मोठी कारवाई करतील का, असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे मागील एक वर्षापासून एकाही महसूल अधिकाऱ्यांनी यावर कारवाई केलेली नाही.गत काही दिवसात जिल्हा खनिकर्म अधिकारी भंडारा यांनी अनेक ठिकाणी अवैध वाळू व्यावसायिकावर कारवाई केली. त्यामुळे त्यांनी मोहगाव टोली येथे अवैध वाळू व्यवसायिकांवर कारवाई करून अवैध वाळू चोरी थांबवावी, अशी मागणी मोहगाव देवी, रोहणा येथील अनेक नागरिकांनी केलेली आहे. पहाटेला पाच वाजतापासून ट्रॅक्टरद्वारे नदीमधील वाळू जमा करून ती वाघमारे यांच्या शेतात जमा केली जाते.दररोज सकाळी व सायंकाळी तीन जेसीबीने मोठ्या प्रमाणात टिप्पर भरून ही रेती नागपूर येथे विक्रीसाठी पाठविली जाते.या वाळूच्या अवैध व्यवसायात स्थानिक तरुण सुद्धा गुंतलेले आहेत. गतवर्षीच्या पावसाळ्यापासून आतापर्यंत याठिकाणी एकदाही कारवाई झालेली नसल्याने वाळू माफियांचे मनोबल वाढलेले आहे. सर्वच विभागाचे हात ओले झालेले असल्याने कारवाई होत नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या क्षणी सुद्धा वाघमारे यांच्या शेतात १०० टिप्परच्या जवळपास वाळू साठा जमा केलेला आहे. वाळू घेऊन जाणारे टिप्पर बिनबोभाट सुरू आहेत. टिप्पर तलाठी कार्यालयात समोरूनच रात्रंदिवस वाळूची चोरी करून नेत असतानाही तलाठी मूग गिळून बसले आहे.एखाद्या लिलाव झालेल्या घाटाला ही लाजवेल एवढा मोठा वाळू व्यवसाय या ठिकाणी सुरू आहे. तरीही प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत. वाळू चोरीमुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल पाण्यात बुडत आहे स्थानिक वाळू व्यावसायिकांनी वाळूच्या अवैध व्यवसायातून कमविलेल्या पैशातून ट्रॅक्टर, जेसीबी, टिप्पर विकत घेतलेले आहेत. वाळू व्यवसायिकामधील एका मोठ्या व्यावसायिकाने एका अधिकाऱ्याला वातानुकूलित यंत्र घेऊन दिला असल्यानेच कारवाई होत नसल्याची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे.या वाळूमाफियांना एका लोकप्रतिनिधीचे सुद्धा पाठबळ असल्याचे बोलले जाते. दिवस-रात्र सुरू असलेल्या अवैध वाळू व्यवसायामुळे येथील रस्ते पूर्णत: उखडलेले असल्याने सामान्य नागरिकांना जाता-येताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हा रेती व्यवसाय त्वरित बंद करावा व जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी कारवाई करावी, अशी मागणी अनेक नागरिकांनी केलेली आहे.