शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

गुटख्याची खुलेआम अवैध विक्री

By admin | Updated: November 8, 2016 00:42 IST

छत्तीसगड आणि मध्यप्रदेश राज्याच्या सीमा लागून असलेल्या भंडारा जिल्ह्यात गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे.

एफडीएचे दुर्लक्ष : अन्न सुरक्षा मानद कायद्याची पायमल्लीभंडारा : छत्तीसगड आणि मध्यप्रदेश राज्याच्या सीमा लागून असलेल्या भंडारा जिल्ह्यात गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. त्यामुळे राज्यात गुटखाबंदी असतानाही अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारवाया थांबल्यामुळे गुटखा विक्रेत्यांचे फावत आहे. भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटखा विक्री होत आहे. येथील एफडीएच्या अधिकाऱ्यांमुळे गुटखा विक्रीचा अवैध व्यवसाय फोफावला आहे. शहरात गुटख्याचे व्यापारी नसले तरी साठा करणारे मात्र आहेत. त्यांच्याकडूनच किरकोळ व्यापारी गुटख्याची खरेदी करतात. त्यामुळे शहरात गुटखा विक्रीचे प्रमाण वाढलेले आहे.भंडारा शहरासह सर्वच तालुक्याच्या ठिकाणी खर्राविक्री जोरात सुरू आहे. पूर्वी १० रूपयाला मिळणारा खर्रा आता २० रूपयाचा झाला आहे. भंडारा शहरात दिवसाला खर्रा विक्रीची उलाढाल लाखांवर आहे. अनेक पानठेला व्यावसायिक हाताने खर्रा घोटण्याऐवजी आता मशिनचा वापर करू लागले आहे. मोठ्या प्रमाणावर सुपारी, तंबाखू, चुना याचे मिश्र्रण तयार करून दिवसभरात ५० किलोहून खर्रा विकला जातो. यात शाळकरी मुले, महिला यांचेही खरेदीदारांमध्ये अधिक प्रमाण आहे. भंडारा शहरात सर्वच शाळांच्या परिसरात १०० मीटर अंतरावर पानठेल्यातून खर्रा विक्रीचे काम सुरू आहे. मात्र कोणतीही शासकीय यंत्रणा या पानठेला दुकानाविरूद्ध कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)