शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
2
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
3
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
4
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
5
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
6
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
7
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
8
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
9
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
10
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
11
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
12
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
13
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
14
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
15
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
16
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
17
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
18
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
19
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
20
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

नदीपात्रातून रेतीच्या अवैध उपसा सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 06:00 IST

तुमसर तालुक्यात १३ रेती घाटांची शासन दप्तरी नोंद आहे. त्यापैकी केवळ चारगाव हा एकच रेतीघाट लिलाव झाला आहे. उर्वरीत १२ रेती-घाटांचे लिलाव झाले नाही, परंतु लिलाव न झालेल्या रेती घाटातून राजरोसपणे सर्रास रेतीची चोरी करणे सुरु आहे.

ठळक मुद्देवैनगंगा, बावनथडी नदी पात्र : कोट्यवधीचा महसूल पाण्यात, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : लिलाव नसलेल्या वैनगंगा, बावनथडी नदी पात्रातून पुन्हा रेतीचा अवैध उपसा राजरोसपणे सुरु करण्यात आला आहे. महसूल प्रशासनाचा येथे आशिर्वाद आहे. राज्य शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडत आहे. रेती उपसा सुरु प्रकरणी दबावतंत्र की अर्थकारण आहे, हा संशोधनाचा विषय आहे. प्रशासनाने रेती तस्करांसमोर नांगी टाकल्याचे चित्र दिसत आहे.तुमसर तालुक्यात १३ रेती घाटांची शासन दप्तरी नोंद आहे. त्यापैकी केवळ चारगाव हा एकच रेतीघाट लिलाव झाला आहे. उर्वरीत १२ रेती-घाटांचे लिलाव झाले नाही, परंतु लिलाव न झालेल्या रेती घाटातून राजरोसपणे सर्रास रेतीची चोरी करणे सुरु आहे. तुमसर तालुक्यातील पांढºया शुभ्र रेतीला नागपूरच्या बाजारपेठेत मोठी मागणी आहे. त्यामुळे तुमसर व मोहाडी तालुक्यातील रेती घाटांतून अवैध नियमबाह्य रेतीची चोरी करणे सुरु आहे. मध्यंतरी रेती उपसा बंद होता. पुन्हा तो सुरु करण्यात आला आहे.नदी पात्रात ट्रॅक्टर घालून मजूरांच्या माध्यमातून रेती नदीकाठावर डम्पींग केली जाते. त्यानंतर ती जेसीबीच्या साहाय्याने ट्रकमध्ये भरली जाते. दररोज राजरोषपणे अवैध रेतीचे ट्रक नदीघाटावरुन रवाना होत आहे. महसूल प्रशासन येथे मूग गिळून गप्प आहे. आतापर्यंत शेकडो ट्रक रेतीचा उपसा करुन रेतीची विल्हेवाट लावण्यात रेती तस्कर यशस्वी झाले आहेत.नदी घाट असलेल्या गावातील ट्रॅक्टर येथे भाडयाने घेण्यात येते. त्यांना रोजगार देण्याच्या नावाखाली सर्रास रेतीचा उपसा करण्यात येत आहे. रेती तस्करांनीही काही ट्रॅक्टर या कामात लावले आहेत. नदी काठावर जेसीबी येथे ठेवली आहे. जेसीबीने ट्रकमध्ये रेती भरली जाते. सर्रास रेती चोरी सतत सुरु असतांना महसूल प्रशासनाकडून आतापर्यंत चौकशी झाली नाही. जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनीही यासंदर्भात अजूनपर्यंत दखल घेतली नाही. येथील रेती उपसा दबावतंत्र की अर्थकारणामुळे सुरु आहे हा संशोधनाचा विषय आहे.रेती उपसा व चोरी संदर्भात अनेक कडक नियम आहेत परंतु कारवाई होत नाही. पर्यावरणाला नुकसान पोहचत आहे. नदी घाट बचावाकरीता कुणीच वाली नाही. पर्यावरण प्रेमीही येथे समोर येत नाही. नियम केवळ कागदोपत्री येथे दिसत आहे. केवळ उंटावरुन शेळया हाकण्याचा प्रकार येथे सुरु आहे. गुणवत्ता प्राप्त व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची गरज आहे.केवळ एकच रेती घाटाचा लिलावमागील चार वर्षापासून तुमसर तालुक्यात प्रचंड चोरीने रेतीचा उपसा करण्यात आला. महसूल प्रशासनाने सात रेतीघाट लिलावात समावेश केला होता. केवळ एका रेती घाटाचे येथे लिलाव झाला. इतर घाट लिलाव झाले परंतु नदी पात्रात रेती नाही म्हणून रेती कंत्राटदारांनी न्यायालयाचे दार ठोठावले. नदी पात्र पोखरलेले असल्याची कंत्राटदारांची तक्रार आहे. रेतीची सर्रास चोरी होत असतांना महसूल प्रशासनाने तुमसर तालुक्यात एकालाही आर्थिक दंड प्रकरणाची कारवाई केली नाही, हे विशेष.

टॅग्स :sandवाळू